कधी १ झाडही दत्तक न घेणाऱ्यांनी गावांबद्दल बोलू नये : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या माणसाने शिवाजी पार्कवरचे एक झाडही दत्तक घेतले नाही. ते मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाबद्दल बोलतात. अशी टीका आशिष शेलार यांनी केली. मुंबईतील रंगशारदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या २९ एप्रिलला होणार आहे. याचदरम्यान, मुंबईतील रंगशारदा येथे पत्रकार परिषदेत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोजित सभेत पंतप्रधान मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडिओ त्यांनी दाखविला होता.

त्यालाच प्रत्युत्तर देतांना मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ दाखवून सत्य दाखविले. तसेच तुम्ही करताय तो विपर्यास, आमचे खासदार करतात तो प्रयास. ज्या माणसाने शिवाजी पार्कवरचे एक झाडही दत्तक घेतले नाही. ते मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाबद्दल बोलतात. अशी टीका आशिष शेलार यांनी केली. इतकेच नव्हे तर, ज्यांनी कधी झाडंही दत्तक घेतले नाही ते गाव काय दत्तक घेणार असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

याचबरोबर, राज ठाकरेंनी केलेल्या नोटाबंदीतील घोटाळ्याच्या आरोपावरही शेलार यांनी उत्तर दिले. नोटाबंदी हा एका रात्रीत आलेला निर्णय नाही, काळा पैसा बँकेत जमा करा, कर भरा असे आवाहन आधी करण्यात आले होते. जनतेशी संवाद साधाला सरकारने.

काळ्या पैशावर प्रहार करणे हे माझे कर्तव्य आहे. असे मोदींनी आधीच संगितले होते. नोटाबंदीनंतर ३ लाख ३४ हजार बनावट कंपन्या बंद झाल्या मग हा घोटाळा आहे का? नोटबंदी नंतर टॅक्सचे कलेक्शन हे ७ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढले. इनकम टॅक्स भरणारे ३ कोटी ८० लाख होते ते नोटबंदीनंतर ६ कोटी ८६ लाख झाले. घराच्या किंमती कमी झाल्या. असेही त्यांनी म्हंटले.

तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेले महाराष्ट्रातील बलात्काराच्या घटनांची आकडेवारी संदर्भातील भाषणही दाखविले. निर्भया प्रकरण, जनजागृतीमुळे बलात्काराच्या तक्रारींध्ये वाढ झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. यानंतर तक्रारी वाढल्या, त्या महिलेला संरक्षण देणे सरकारचे काम आहे, असेही त्यांनी म्हंटले.