राज ठाकरेंना लागले सुनबाईंच्या आगमनाचे वेध

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी नाशिकमधल्या सप्तश्रृंगी देवीच्या चरणी अमित आणि मितालीची लग्नपत्रिका ठेवून देवीचे आशीर्वाद घेतलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत सकाळी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज ठाकरेंच्या घरी सध्या लग्नाची लगबग सुरु असून मुलगा अमित आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. त्यानिमित्तानेच राज ठाकरे मंदिरात आज सिद्धिविनायक मंदिरात गेले. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी अमित ठाकरेची लग्नपत्रिका बाप्पाचरणी अर्पण करत आशिर्वाद घेतले. बाप्पाच्या आशिर्वादानंतर मुलाच्या लग्नाच पाहिलं आमंत्रन त्यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना दिल आहे. राज यांनी सपत्नीक टाटांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेत त्यांना अमितच्या लग्नाचं आमंत्रण दिलं.

राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाची तारिख ?
राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे दोघेही २७ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. मुंबईतल्या सेंट रेजिस या आलिशान ठिकाणी अमित आणि मितालीचाराजठाकरेंची  विवाहसोहळा पार पडणार आहे. गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांचाही साखरपुडा झाला होता.
 
राज ठाकरेंची सुनबाई कोण ?

Related image

राज ठाकरेंच्या सुनबाईंचे नाव मिताली बोरुडे असून मिताली फॅशन डिझायनर आहे.तिने फॅड इंटरनॅशनल येथून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले असून. ती सुप्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची मुलगी आहे.अमित ठाकरे आणि मिताली यांची ओळख जुनी असून.या ओळखीचे रुपांतर नंतर पुढे प्रेमात झाले. आता हे  दोघेहि लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
Loading...
You might also like