Raj Thackeray-Vasant More | राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले – ‘माझ्या ज्या शंका होत्या त्या सर्व दूर झालेल्या आहेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Thackeray-Vasant More | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मनसे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर अनेक घडामोडीची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. दरम्यान अखेर राज ठाकरे यांच्या निरोपानंतर वसंत मोरे यांनी त्यांची शिवतीर्थ (Shivtirtha) या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Raj Thackeray – Vasant More)

 

”राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माझ्या ज्या शंका होत्या त्या सर्व दूर झालेल्या आहेत. ठाण्यात 12 एप्रिलला होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे यांनी आपल्याला बोलावल्याचं,” वसंत मोरे (Vasant More) यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले, ”ठाण्याची सभा ही उत्तरसभा आहे. ठाण्याच्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील त्यामुळे तू ठाण्याच्या सभेत ये, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं,’ वसंत मोरे यांनी म्हटलं. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मी 100 टक्के मी मनसेत आहे आणि मनसेतच राहणार असल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. (Raj Thackeray-Vasant More)

 

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली.
वसंत मोरे यांनी आपल्याला सर्वच पक्षांकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान आता राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आपण समाधानी असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Raj Thackeray-Vasant More | pune mns leader vasant more meet mns chief raj thackeray at shivtirtha vasant more reaction

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा