राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या तरुणाला काढावं लागल्या उठाबशा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जनतेने राजकियनेत्यांवर टीका करणे काही नवे नाही. राजकीयनेत्यांवर टीका करणाऱ्यांना त्यांची टीका महागात पडणे हेही काय नवीन नाही. अशीच एक सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्दात टीका करणे पुण्यातील एका तरुणाला महागात पडले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यामुळे त्याला चक्क उठाबशा काढाव्या लागल्या.

पुण्यातील एका रोहित नावाच्या तरुणाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोशल मीडियावरील पेजवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. दरम्यान पुण्यातील संतापलेल्या मनसेसैनिकांनी रोहितचा शोध घेतला. त्यावेळी रोहितला माफी मागायला लावली तसेच त्याला ५० उठाबशा काढायला लावल्या. इतकेच नव्हे तर यापुढे राज ठाकरेंवर आक्षेपार्ह आणि असभ्य शब्दात टीका करणाऱ्यांना अशीच शिक्षा दिली जाईल, असा इशाराही मनसैनिकांनी दिला.

विशेष म्हणजे मनसेसैनिकांचा क्रोध कास आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मात्र पुण्यातील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष साबळे-पाटील यांच्यासह मनविसेचे शहर अध्यक्ष विकी अमराळे, विभाग अध्यक्ष राहुल गवळी आदी मंडळी रोहितच्या घरी पोहोचले. दरम्यान त्या तरुणाच्या घरी गेल्यावर त्याची परिस्थिती हलाखीची असल्याचे समजले. त्याचे घर भाड्याचे आहे, तर वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्याला मारहाण न करता उठाबशा काढायला लावल्या. असे मनसेसैनिकांनी म्हंटले आहे.