उध्दव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहण्याबाबत राज ठाकरेंनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनालाइन – महाविकासाआघाडी अखेर राज्यात आज सत्तास्थापन करेल. त्यासाठीचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी शिवतीर्थावर होणार आहे. यावेळी कोण कोण उपस्थित राहणार याची चर्चा सुरु झाली. यावेळी या शपथविधीला उद्धव ठाकरेंचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार की नाही यावर स्पष्टीकरण आले नव्हते. परंतू आता वृत्त आहे की राज ठाकरे आज होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहणार हे स्पष्ट झाले आहे.

आज होणाऱ्या शपथविधीली उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करुन निमंत्रण दिले होते. राज ठाकरेंना उपस्थित राहणाचे आग्रहाचे निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिले होते. यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आणि मी येतो असे सांगितले.

आता राज ठाकरे आज होणाऱ्या शपथविधीला कुटूंबासह ते उपस्थित राहणार की नाही यावर स्पष्टीकरण नाही, परंतू राज ठाकरे तर उपस्थित राहणार हे स्पष्ट झाले आहे. यावेळी ते मातोश्रीवर देखील जाऊ शकतात. त्यामुळे सकाळपासून सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

Visit : Policenama.com