राज ठाकरे 27 जुलैला पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार 

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 27 जुलै ला पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे गुरू पौर्णिमा मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cae8cbd4-8cea-11e8-af84-e9f370a2355e’]

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे मागील आठवड्यात मराठवाडा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावरून त्यांनी सडकून टीका देखील केली. त्यांच्या मराठवाड्यातील दौऱ्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यामध्ये एकच चर्चा रंगली. तर त्या पाठोपाठ आता पुण्यात शुक्रवारी 27 जुलै दरम्यान राज ठाकरे गुरू पौर्णिमा मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे गुरूपौर्णिमा मेळाव्यात मनसैनिकांना कशा प्रकारे मार्गदर्शन करतात. तसेच कोणाला त्यांच्याकडून लक्ष केले जाते. याकडे सर्व राजकीय पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे.