राज ठाकरे पुण्यात साधणार राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांशी ‘मनसे’ संवाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस पुण्यात असून या काळात ते मनसेच्या जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांशी संवाद साधणार आहेत.  विधानसभा निवडणुकीत मनसेने काही जागी आपले उमेदवार उभे केले होते. त्यातील केवळ राजू पाटील हे एकमेव मनसे आमदार निवडून आले आहेत. मागील २०१४ मध्ये जुन्नरमधून केवळ शरद सोनवणे हे एकमेव आमदार निवडून आले होते. तेही निवडणुकीपूर्वी शिवसेनेत परतले होते.

विधानसभा निवडणुकीत मनसेला मिळालेले अपयश पहाता पक्षाला पुन्हा एकदा पुर्नजिवित करण्यासाठी जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांना कार्यरत करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असणार आहे.

पक्षाच्या उभारीसाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न शुक्रवार व शनिवारी राज ठाकरे करणार आहे. त्यातून कार्यकर्त्यांना उर्जा देण्याचा व पक्षाची भूमिका निश्चित करण्याचा प्रयत्न या दोन दिवसात केला जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/