धनत्रयोदशीच्या निमित्ताने राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून बोचरी टिका

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर अतिशय बोचरी टीका केली आहे. धनत्रयोदशी निमित्तानं राज ठाकरे यांनी देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. या चित्राद्वारे त्यांनी भाजपाला चांगलेच फटकारले आहे.

हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव ‘धन्वंतरी’ यांचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात!,असे सांगत राज ठाकरे यांनी ‘भारत’ देशाला आयसीयूमध्ये दाखवले आहे.

पंकजासारखी वाघीण विरोधकांना पुरून उरेल : खा. प्रीतम मुंडे 

यावर आयसीयूबाहेर काळजीत उभे असणाऱ्या जनतेला धन्वंतरी सांगत आहेत की, काळजीचे कारण नाही! परंतु गेल्या चार-साडेचार वर्षात त्याच्यावर खूपच अत्याचार झालेत! लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर !, अशा शब्दांत त्यांनी थेट भाजपा सरकारवर बोचरी टीका केली आहे.

या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागेल, असे सूचित केले आहे.

व्यंगचित्राच्या एका फटाऱ्यानी तुम्ही जेवढी बोचरी टिका करु शकता, तेवढी हजारो शब्द लिहूनही करता येत नाही, असे व्यंगचित्राबाबत म्हटले जाते. हजारोंच्या सभा गाजविणारे राज ठाकरे त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या व्यंगचित्राद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांनाही या म्हणीचा प्रत्यय आला असेल. त्यातूनच त्यांनी नियमितपणे व्यंगचित्राचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.