अश्लील ट्रोल प्रकरण : केतकी चितळे राज ठाकरेंना भेटली, राज म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदी भाषेतून बोलल्याने सोशल मिड़ीयावर ट्रोलर्सकडून ट्रोल झाल्यानंतर जशास तसे उत्तर दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिचे अभिनंदन केले आहे. केतकी चितळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी मला अभिनंदन करण्यासाठी बोलवलं होतं. अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

केतकी चितळे हिने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालीन जितेंद्र ठाकरे यांच्यासोबत आज सकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्ण कुंज या निवासस्थानी भेट घेतली.

काय म्हणाले राज ठाकरे ?
सोशल मिडीयावरील ट्रोल्सना तू ज्याप्रकारे उत्तर रोखठोक उत्तर दिलंस, त्यामुळे अनेक दबलेल्या आवाजांना तू व्यक्त होण्यासाठी हिंमत दिलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन

काय म्हणाली केतकी ?
राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यावर केतकी चितळेने प्रतिक्रिया दिली आहे. मला राज ठाकरे यांनी अभिनंदन करण्यासाठी बोलवलं होतं.

काय म्हणाल्या शालीनी ठाकरे ?
सोशल मिडीयात दुर्देवाने महिलांच्या मताचा, वैयक्तिक प्रतिष्ठेचा आदर करण्याची वृत्ती समाजात नाही. महिलांशी सोशल मिडीयावर वाद झाल्यानंतर काहीजण अत्यंत घाणेरड्य़ा शब्दांत महिलांवर टीका करतात. मात्र महिलांवर बीभत्स टीका करणाऱ्यांना केतकीने जे रोखठोक उत्तर दिलं. ते निश्चितच कौतुकास्पद आहे. असं मत शालीनी ठाकरे म्हणाल्या.

काय आहे प्रकरण ?
केतकी चितळे हिंदीत बोलल्यानंतर तिच्यावर सोशल मिडीयावर ट्रोलर्सनी अश्लील भाषेत ट्रोल केले. दरम्यान त्यानंतर त्या टिकेला उत्तर देणारा व्हिडीओ केतकीने सोशल मिडीयावर पोस्ट केला. तिने ट्रोलर्सना रोखठोक भाषेत उत्तर दिले.

केतकी चितळेने याप्रकरणी शिवसेनेच्या चित्रपट सेनेच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्रोलर्सवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची