संभाजी भिडेंच्या ‘आमसूत्रा’वर राज ठाकरेंचे मिश्किल व्यंगचित्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या बेधडक भाषणासाठी तर प्रसिद्ध आहेतच पण त्याच्या व्यंगचित्रांसाठी देखील प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अमित शहा यांच्या बकेट लिस्टचे व्यंगचित्र रेखाटले होते. या व्यंगचित्राची राजकिय क्षेत्रात बरीच चर्चा झाली. भाजपने त्यांच्या व्यंगचित्राला प्रत्युत्तर देणारे व्यंगचित्र देखील प्रसिद्ध केले होते. आता राज ठाकरे यांनी मनसेच्या ट्विटरवर एक नवीन व्यंगचित्र पोस्ट केले आहे.

या व्यंगचित्राला ‘आयत्या बळावर’ असे नाव देण्यात आले आहे. या चित्राचे दोन भाग करण्यात आले आहेत. एका चित्रात दोन महिला आहेत त्यामधील एका महिलेच्या हातात बाळ असून त्यामध्ये बाळाच्या चेह-या ऐवजी आंबा रेखाटण्यात आला आहे. तसेच “अय्या ..!भिडेंच्या बागेतून वाटतं ? असा मजेशीर संदेश लिहण्यात आला आहे.

तसेच दुसऱ्या छयाचित्रात स्पर्धा परीक्षांतून उत्तीर्ण झालेले आयएएस अधिकारी वाकून पुस्तकात डोकावताना दाखवले आहेत तर त्यांच्यावरून उद्योगपती धार्जिणे बाहेरील क्षेत्रातील व्यक्ती उडी मारून पुढे जाताना दाखवले आहे तर मोदी आणि अमित शहा त्या व्यक्तीचे स्वागत हार घेऊन करीत आहेत असे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे.

यातिला एका चित्रात संभाजी भिडे यांच्या वक्तव्याला विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. तर मोदींनी काही दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षांतून उत्तीर्ण झालेल्या आयएएस अधिका-यांसंदर्भात दिलेल्या निर्णयावर राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रा द्वारे टीका केली आहे.