राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पहिल्या सभेचे पुण्यात आज आयोजन करण्यात आले होते. मात्र पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे ही सभा रद्द करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी सायंकाळी शुक्रवार पेठेत सरस्वती विद्यामंदिराच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, सायंकाळी मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. त्यामुळे ठाकरे यांची सभा रद्द करण्यात आली.

राज यांच्या प्रचारसभेसाठी मनसेला मागितलेल्या जागांवर परवानगी मिळत नव्हती. राज यांच्या सभेसाठी मागितलेल्या जागांवर परवानगी न दिल्यास थेट चौकातच सभा घेण्याची तयारी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. अखेर नातू बाग येथील सरस्वती विद्या मंदिराचे मैदान मिळाले. त्यानुसार आज 9 तारखेला सायंकाळी 6 वाजता ही सभा होणार होती.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like