हैदराबाद गँगरेप आणि एन्काऊंटर प्रकरणावर राज ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल पोलीसांनी हैद्राबाद बलात्कारातील आरोपींचा एन्काऊंटर केला. त्यानंतर संपूर्ण देशातून याबाबतच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. अनेकांनी सोशल मीडियावरून पोलीसांच्या या निर्णयाचे कौतुक केले होते. सर्वच स्तरांतून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो”, अशा प्रकारचे एक ट्विट राज ठाकरेंनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून करत पोलीसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे.

डॉक्टर असलेल्या तरुणीवर 28 नोव्हेंबर रोजी नराधमांनी बलात्कार केला होता. कोणालाही समजू नये म्हणून त्यांच्याकडून पीडितेचा मृतदेह देखील जाळण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभर संतापाची मोठी लाट निर्माण झाली होती. अनेकांकडून यातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्या अशी मागणी देखील केली जात होती.

अखेर काल या घटनेचा शेवट झाला. तपासासाठी नेण्यात आलेल्या आरोपी पळून जाताना पोलीसांवर गोळीबार केला आणि पोलीसांच्या प्रती हल्ल्यात चारही आरोपी ठार झाले होते. यानंतर संपूर्ण देशात याबाबत आनंद व्यक्त केला जात होता.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like