राज ठाकरेंच्या सभा म्हणजे स्टॅंड अप कॉमेडी शो : ‘या’ नेत्याने केला हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे स्टॅंड अप कॉमेडी शो आहेत. काल नांदेडला झाला. लवकरच महाराष्ट्रात अजून काही ठिकाण तो होणार आहे. असा टोला लगावत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात जमा करावा अशी मागणीही केली.

राज ठाकरे सध्या स्वत:च्या कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. परंतु ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभांचा खर्च हा सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी उमेदवाराच्या खात्यात दाखवावा. याची मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत. राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणत्या पक्षाकडून करण्यात येत आहे. ही माहिती निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी अशी मागणीही आम्ही करणार आहोत. असं त्यांना सांगितले.

राज ठाकरे यांचा पक्ष संपला आहे. ते सध्या मोदी आणि अमित शहा यांना संपविण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नाही. उरले सुरले नगरसेवकसुद्धा पक्षातून जात आहेत. जे स्वत: संपले आहेत. ते दुसऱ्याला संपविण्याची भाषा करतात असा टोला त्यांनी लगावला.