‘पानिपत’बाबत राज ठाकरेंनी केलं विशेष ‘आवाहन’, म्हणले – ‘माझ्या मित्राचा चित्रपट नक्की पहाच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर, कृती सेनन, संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरे आणि जीनत अमान स्टारर तसेच आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानीपत हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यास अवघे 2 दिवस राहिले असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा पानीपत सिनेमा फक्त मराठी माणसानंच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी पहावा असं आवाहन केलं. राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात, “पानीपतची लढाई ही मराठेशाहीनं हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपवणाऱ्या मरहट्ट्यांच्या शौर्याचा अविष्कार होता म्हणून पहावी.”

‘फक्त मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी चित्रपट पहावा’

आपल्या ट्विटमध्ये पुढे राज ठाकरे म्हणतात, “मनगटात प्रचंड बळ असलेली अन अटकेपार झेंडा नेणारी मराठेशाही कुठे आणि का कमी पडली ? हे पाहण्यासाठी पानीपतच्या लढाईकडं पहावंच लागेल. त्यासाठी उपलब्ध असलेला ध्वनीचित्र दस्तावेज म्हणजेच माझे मित्र श्री. आशुतोष गोवारीकर यांचा पानीपत चित्रपट. फक्त मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनी देखील पहायला हवा.” असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

‘मराठीचा मुद्दा निवडणुकांपुरताच, पानीपत मराठीत डब करा’ : नेटकऱ्यांची मागणी
दरम्यान या ट्विटवर काही युजर्सनं हिंदी भाषेला घेऊन काहीशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मराठीचा मुद्दा फक्त निवडणुकांपुर्ताच असतो असं म्हणत हा सिनेमाही मराठीत हवा असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर इतरही अनेक नेटकऱ्यांनी हा सिनेमा मराठीत असायला हवा होता असं म्हटलंय. काहींनी थेट मागणीच केली आहे की, आधी सिनेमा मराठीत डब करा तरच आम्ही पाहू अस म्हणत राज ठाकरेंच्या ट्विटवर कमेंट केल्या आहेत.

https://twitter.com/ImShridhar17/status/1202236480959078400

https://twitter.com/APW_Akshay/status/1202240490260684802

पानीपतच्या युद्धाविषयी थोडक्यात…

पानीपत हा आशुतोष गोवारीकर यांचा बिग बजेट पीरियड ड्रामा सिनेमा आहे. 14 जानेवारी 1761 रोजी झालेल्या पानीपतच्या लढाईवर आधारीत हा सिनेमा आहे. हे युद्ध अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये झालं होतं. मराठ्यांचे अनेक सैनिक यात धारातीर्थी पडले होते. अर्जुन कपूरने मराठा शासक सदाशिवराव भाऊंची भूमिका साकारली आहे. संजय दत्त यात अब्दालीच्या भूमिकेत दिसत आहे.

सिनेमाविषयी…

पानीपत या सिनेमताबद्दल बोलायचं झालं तर, अर्जुन कपूर, कृती सेनन, संजय दत्त, पद्मिनी कोल्हापुरे आणि जीनत अमान प्रमुख भूमिकेत आहेत. आशुतोष गोवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 6 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती गाजतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.