‘हे वर्ष तु्म्हाला सर्वांना मोदीमुक्त भारत असे जावो’ : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हे वर्ष मोदीमुक्त भारत  असे जावो असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेच्या सुरुवतीलाच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला. शिवतीर्थावर राज ठाकरे गुढीपाडावा मेळाव्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी मोदींवर टीका केली.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रातून आलेल्या सर्वच मनसैनिकांना मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. तुम्हाला सर्वांना हे वर्ष आनंदाचं भरभराटीचं सुखाचं समृद्धीचं आणि मोदीमुक्त भारताचं जावो अशी प्रार्थना करतो” असे म्हणत राज ठाकरे यांनी मोदींवर टीका करत गुढीपाडव्याच्या वेगळ्याच शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. मोदी आणि शहा हे देशावर आलेलं संकट आहे असे राज ठाकरे म्हणाले. हे संकट दूर करण्यासाठी मी आता लढणार आहे असेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Loading...
You might also like