राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून ‘वर्मा’वर बोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून टीका केली आहे. या व्यंगचित्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, आलोक वर्मा आणि उद्योगपती अनिल अंबांनी यांना रेखाटण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याप्रमाणेच राज ठाकरेंनी सुद्धा राफेल घोटाळ्याच्या चौकशीमुळेच आलोक वर्मा यांना पदावरुन दूर केल्याचा आरोप केला आहे. सध्या या प्रकरणावरून देशात गदारोळ सुरू आहे.