‘राजा हिंदुस्तानी’ मधील ‘ही’ अभिनेत्री पहा आता कशी दिसते ! आर्थिक अडचणींमुळे झाले ‘हाल’ आता करते ‘असं’ काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कल्पना अय्यरने बॉलिवूडमध्ये आयटम नंबरला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. राजा हिंदुस्तानी या सिनेमातील परदेसी परदेसी या गाण्यात आपण त्यांना पाहिलं आहे. कल्पना या फक्त उत्तम अभिनेत्रीच नाही तर पॉप सिंगरही आहेत. त्यांनी अनेक लाईव्ह शोदेखील केले आहेत. अनेक सिनेमात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अचानकच त्या सिनेमांपासून दूर गेल्या आहेत.

कल्पना अय्यर आणि अमजद खान यांच्या अफेअरची चर्चा
कल्पना अय्यर आणि अमजद खान यांच्या अफेअरची त्या काळी खूप चर्चा झाली. असं सांगितलं जातं की, त्यांचं अमजद यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. म्हणूनच अमजद यांच्या निधनानंतर त्यांनी लग्न केलं नाही. अनेकांना माहिती नसेल परंतु नंतर त्या दुबईला स्थायिक झाल्या. ग्लॅमरच्या दुनियेपासून नंतर त्या दूर गेल्या. त्यांनी दुबईला रेस्टॉरंट सुरू केले.

‘तेव्हा काय कारवं हे मला सुचत नव्हतं’
एका मुलाखतीत बोलताना कल्पना म्हणाल्या की, “आयुष्यात अनेकदा चढ उतार येतात. माझ्याही आयुष्यात आले. मला काही समस्यांना सामोरे जावे लागले. मी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली होती. मग मी काम शोधण्यास सुरुवात केली. काय कारवं हे मला सुचत नव्हतं. अचानक राजन सिप्पी आणि त्यांच्या पत्नीने मला दुबईमध्ये येण्यास सांगितले.”

View this post on Instagram

Diwali At Nehaji and Alokji s Home ❤️🙏

A post shared by Kalpana Iyer (@kalpanaiyer) on

‘आज मला माझ्या कामातून मिळणाऱ्या आनंदामुळे मी खुश आहे’
पुढे बोलताना कल्पना म्हणाल्या की, “दुबईमध्ये सिप्पी आणि त्यांच्या पत्नीने मला कामही मिळवून दिले. त्यामुळे मी तिकडेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आज हॉटेल व्यवसायात मी रमली आहे. त्यामुळेच चित्रपचसृष्टीपासून दुरावली असली तरी आज मला माझ्या कामातून मिळणाऱ्या आनंदामुळे मी खुश आहे.

कल्पना यांच्या कामाविषयी थोडक्यात…
कल्पना यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, मुझे जान से भी प्यारा, कोई यहां नाचे नाचे, यांसारखी अनेक हिट गाणी त्यांनी दिली आहेत. अंजाम, राजा हिंदुस्तानी, हम साथ साथ है, सत्ते पे सत्ता या सिनेमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

View this post on Instagram

Memories 🙏

A post shared by Kalpana Iyer (@kalpanaiyer) on

View this post on Instagram

Advt for TBZ /Opera house Yearrrrs ago

A post shared by Kalpana Iyer (@kalpanaiyer) on

View this post on Instagram

Memories / Show with Shekhar Suman looooong Ago

A post shared by Kalpana Iyer (@kalpanaiyer) on

View this post on Instagram

Kavita Rohan & Me august 2014

A post shared by Kalpana Iyer (@kalpanaiyer) on