सुरेश कलमाडींचे स्वीय सहायक राजा महाजन यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम : माजी मंत्री सुरेश कलमाडी यांचे स्वीय सहायक राजा महाजन (वय ६२) यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांच्यावर सकाळी साडेअकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुरेश कलमाडी यांचे स्वीय सहायक म्हणून राजा महाजन यांनी सुमारे ३० वर्षे काम केले. पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन, पुणे फिल्म फेस्टिवल यांच्या नियोजनात त्यांचा सहभाग असायचा. ब्राम्हण सेवा संघाचे ते उपाध्यक्ष होते.

मधुमेहाच्या त्रासाने ते आजारी होते. त्यात त्यांच्या पायाला जखम झाली. २७ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेहाचा परिणाम त्यांच्या शरीरातील अवयवांवर झाला होता. त्यातूनच त्यांचे निधन झाले.