Rajabhau More Passes Away | मराठी मनोरंजन सृष्टीतून वाईट बातमी; ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन : ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचे निधन (Rajabhau More Passes Away) झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री आठ वाजता त्यांचा मृत्यू (Rajabhau More Passes Away) झाला. त्यांच्या जाण्याने रंगभूमीवर एक पोकळी निर्माण झाली आहे.

अमरावतीमध्ये राज्य नाट्य स्पर्धेत प्रयोग बघतानाच त्यांचा मृत्यू झाला. ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ हे नाटक सुरू असतानाच अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने झेनित हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी आजवर त्यांचे संपूर्ण आयुष्य रंगभूमीला समर्पित केले होते आणि शेवटचा क्षण देखील त्यांनी रंगभूमीवरच व्यतीत केला. (Rajabhau More Passes Away)

त्यांच्या या अशा अचानक जाण्यामुळे अमरावतीकरांना आणि रंगकर्मींना मोठा धक्का बसला आहे.
तर आज त्यांच्या राहत्या घरी अंबागेट अमरावती येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात तीन बहीण दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यंदाच्या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार राजाभाऊ मोरे यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांनी आजवर 100 हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले. नाटकांव्यतिरिक्त ते सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विभागात ही सक्रिय होते.

Web Title :- Rajabhau More Passes Away | stage actor rajabhau more passes away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | परदेशात व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील व्यावसायिकाला 37 लाखांना गंडा

Pathaan Controversy | दीपिका पदुकोणचा जुना व्हिडीओ व्हायरल; ” रंगाने धर्म निवडला नाही……”

Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन