Homeमनोरंजनअजय देवगणला राजामौलीने दिले Birthday Gift, RRR मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक OUT

अजय देवगणला राजामौलीने दिले Birthday Gift, RRR मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक OUT

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अजय देवगण आज त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अजयचा आगामी चित्रपट RRR मधील त्याचा फर्स्ट लूक मोशन पिक्चर्सने रिलीज केला आहे. स्वतः अजयने चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. अजयचा हा दमदार लूक पाहून चाहत्यांची चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

अजय देवगण हा नेहमीच कोणत्याही सिनेमातील त्याचा एन्ट्री सीन खूप इंटेस ठेवतो. आता RRR मधील त्याचा इंटेस लूक प्रदर्शित झाला आहे. अजयने ट्विटरवर जवळपास एक मिनिटाचा व्हिडीओ शेअर केला असून यात तो खूप दमदार लूकमध्ये दिसत आहे. यात त्याने एक शॉल परिधान केली असून ती काढताना तो प्रभावशाली भूमिकेत दिसत आहे. त्याला सैनिकांनी घेरलेले दिसत आहे आणि बॅकग्राउंडला तीन शब्द रिपीट होत आहेत लोड, एम, शूट. अजयने पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, एस.एस. राजामौली मला इतके एक्साइटिंग आणि पावरफुल भूमिका दिल्यामुळे मी आभारी आहे. RRR चित्रपटाबद्दल सांगायचे तर हा चित्रपट 2021 च्या दस-याच्या दिवशी जगभरात रिलीज होणार आहे. हा चित्रपट तेलगू, तमीळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषेत रिलीज होणार आहे. अजयच्या आधी अल्लूरी सीता रामाराजूच्या भूमिकेतील राम चरणचा लूक आउट झाला होता. तसेच आलिया भटच्या वाढदिवसादिवशी सीतेचा लूकदेखील रिलीज झाला होता.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News