… तर ‘दीपिका’ झाली असती बाहुबलीची ‘देवसेना’ !

मुंबई : वृत्तसंस्था  – बाहुबली या चित्रपटाच्या दोन्ही भागाने भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक रेकॉर्ड तोडले. तसेच या चित्रपटातील कलाकारांचे विशेष कौतुकही झाले. या चित्रपटातील  प्रत्येक कलाकार आपल्या प्रभावी भूमिकेमुळे विशेष चर्चेत राहिले. तसेच या चित्रपटातील वेगवेगळ्या भूमिकेसाठी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांना विचारण्यात आल्याचे वृत्तही समोर आले होते.

नुकतेच चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस राजामौली यांनी चित्रपटातील कलाकार प्रभास आणि राणासह ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसोबत या तिघांनी शोमध्ये मनमुराद गप्पा मारल्या.

गप्पांदरम्यान रंगलेल्या ‘रॅपिड फायर राऊंड’मध्ये करणने राजामौली यांना बाहुबली हिंदीत आला असता तर कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीला अनुष्काच्या जागी घेतलं असतं असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी दीपिका पदुकोण हे नाव घेतलं. अनुष्काने साकारलेल्या ‘देवसेना’ या भूमिकेसाठी दीपिका योग्य असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच  हिंदीमध्ये  प्रभास आणि राणालाच घेतलं असतं, कारण त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही असंदेखील ते म्हणाले.