Rajan Salvi | ‘विजय नक्की, शिवसेना व्हीपनुसार मतदान झालं नाही तर ते अपात्र होतील’; राजन साळवींचा बंडखोर आमदारांना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajan Salvi | राज्याच्या घडामोडीत राजकीय संघर्ष काही कमी होताना दिसत नाही. आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून (Maharashtra Assembly Speaker Election) भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) चुरशीची शक्यता आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर साळवी यांनी शिंदे गटातील आमदारांना इशारा दिला आहे. ‘शिवसेनेच्या व्हीपनुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल,’ असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

 

राजन साळवी (Rajan Salvi) म्हणाले, “महाविकास आघाडीतर्फे विधानसभा अध्यक्षपदासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मला विश्वास आहे की महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार मला मतदान करतील आणि विजय आमचाच होईल. शिवसेनेच्या व्हीपनुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल.”

 

दरम्यान, भाजपकडून राहुल नार्वेकर हे निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत.
तर महाविकास आघाडीमधून शिवसेनेचे राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यामुळे उद्या होणा-या निवडणुकीत राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात लढत असणार आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय होतोय की, भाजपचा? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला आहे.

 

Web Title :- Rajan Salvi | my victory is for sure if the voting did not take place according to the shiv sena whip rebel mlas will be disqualified say rajan salvi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Ashish Shelar | CM एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात आशिष शेलार यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या प्रकरण

 

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम