‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेचे प्रोड्युसर राजन शाही यांच्या वडिलांचं निधन !

पोलिसनामा ऑनलाइन –टीव्ही शो ये रिश्ता क्या कहलाता है शोचे निर्माते राजन शाही यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. एका वृत्तानुसार, राज शाही यांच्या वडिलांनी 20 एप्रिल रोजी सकाळीच जगाचा निरोप घेतला आहे.

राजन शाहींच्या वडिलांचं निधन

अशीही माहिती आहे की निर्माता राजन शाही यांचे वडिल गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. यानंतर त्यांनी आपली जीव गमावला. राजन शाहींबद्दल बोलायचं झालं तर ते अनेक मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहे. त्यांच्या प्रॉडक्शनमध्ये अनेक शोज बनले आहेत. राजन शाही यांनी 2007 साली आपलं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं होतं. यात त्यांनी अनेक हिट शोज दिले आहेत.

यात अनेक नाव सांगता येतील जसं की, सपना बाबुलका… विदाई, ये रिश्ता क्या कहलाता है, ये रिश्ते है प्यार के. राजन यांचे सर्वात पॉप्यलर दोन शो ये रिश्ता क्या कहलाता है आणि ये रिश्ते है प्यार के ऑनएअर आहे. परंतु सध्या सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळं दोघांचीही शुटींग ठप्प आहे.