राजर्षी शाहू महाविद्यालयाचा जेईई परिक्षेत दणका

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात दरवर्षी एनआयटी, आयआयटी आणि इतर सीएफटीआयमध्ये इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमांसाठी जेईई-मुख्य परीक्षा घेतली जाते. मुख्य परिक्षेत पास झालेले विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परिक्षेसाठी पात्र ठरतात. नुकत्याच झालेल्या मुख्य परिक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालयाचे १८० विद्यार्थी जेईई ॲडवान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ९९ टक्क्यांच्या पुढील१२ विद्यार्थी आहेत.

अभियांत्रिकी विद्याशाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जेईई मेन्स आणि जेईई ॲडव्हान्स्ड या प्रवेशपरीक्षा महत्त्वाच्या असतात. जानेवारी आणि एप्रिल महिन्यात म्हणजेच एकूण दोन वेळा ही परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थी या परीक्षांमधील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे पुढील प्रवेश घेऊ शकतात.

जेईई मेन्सला गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे मिळून ११० पाठ असतात, तर जेईई ॲडव्हान्स्डला सुमारे १०० पाठ असतात. या दोन्हीही परीक्षा बहुपर्यायी आणि चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा करण्यात येणे अशा पद्धतीच्या असतात.