CAA : पाकिस्तानातून येणार्‍या हिंदू शरणार्थींना अर्ध्या किंमतीत जमीन, राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरात विरोध होत असताना आता राजस्थानच्या गहलोत सरकारने पाकिस्तानहून आलेल्या हिंदू शरणार्थींना नागरिकत्व देण्यात आल्यानंतर आता सवलतीच्या दरात राहण्यासाठी जमीन वाटप करण्यात येत आहे. गहलोत सरकारकडून पाकिस्तानातून भारतात येऊन नागरिकत्व घेणाऱ्या 100 हिंदू कुटूंबाला 50 टक्के सवलतीने जमिनीच्या दस्तावेजाचे वाटप करण्यात येत आहेत.

गहलोत सरकारने हिंदु शरणार्थींना राजस्थानात वसण्यासाठी सवलतीच्या दरात भूखंड देण्याची घोषणा केली आहे. जयपूरमध्ये जयपूर विकास प्राधिकरणात अशा 100 कुटूंबालांना 50 टक्के सवलतीने सरकारी जमीन देण्यास सुरुवात झाली आहे.

केंद्र सरकारद्वारे जसे हिंदू शरणार्थींमध्ये काँग्रेसला खलनायक ठरवण्याचे जसे अभियान सुरु केले आहे, ते लक्षात घेऊन राजस्थानच्या गहलोत सरकारने पाकिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू शरणार्थींना आपले करण्यासाठी मोहिम सुरु केली आहे.

काँग्रेस नेता दूर –

जयपूर विकास प्राधिकरणाने आपल्या स्तरावर 5 पाकिस्तानी हिंदू शरणार्थींना जमिनीचे दस्तावेज देऊन अभियान सुरु केले आहे. काँग्रेसचे नेता मात्र यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. राजस्थानच्या नगर विकास मंत्री शांति धारीवाल म्हणाले की काँग्रेसच्या सरकारने त्यांचे कल्याणकारी काम करण्यास सुरुवात केली आहे, परंतू यावर राजकारण होणे अपेक्षित नाही.

देर आए दुरुस्त आए –

मुख्यमंत्री अशोक गहलोत हिंदू शरणार्थींसाठी लॉबिंग करताना दिसत आहेत. राजस्थानमध्ये 1 लाख पेक्षा जास्त पाकिस्तानी हिंदू शरणार्थींना निवारा देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी गहलोत सरकारच्या या कामामुळे देर आए दुरुस्त आए असे म्हणले आहे. भाजपकडून सांगण्यात आले की या लोकांना राहण्यासाठी मोफत जमीन देखील उपलब्ध करुन दिली जाऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/