भाजपने राजस्थान विधानसभेसाठी उपसले रामबाण अस्त्र 

जयपूर : राजस्थान वृत्तसंस्था – करणी सेनेचे लोकेंद्र सिंह कालवी यांनी अयोध्येला जाऊन राम क्षत्रिय असून त्याचे आम्ही राजपूत वंशज आहोत असे वक्तव्य केले होते. करणीसेना हि भाजपशी संलग्नित राजपूत जातीची संघटना आहे. देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राम नावाचा जप सुरु असतानाच करणी सेनेच्या महत्वाच्या व्यक्तीने राम क्षत्रिय असल्याचे विधान करून आम्ही रामाचे वंशज असल्याचे सांगितले आहे. येत्या निवडणुकीत राजपुताना आपल्या कमळाकडे खेचायचे असेल तर राम नामावर राजपुतांचा स्वाभिमान जागृत करण्याचा भाजप प्रयत्न करीत आहे.

वसुंधराराजेंची राजपूत दमननीती महागात

राजपुतांचे दमन करून आपल्याला राजपुतांमधील प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये असा हातकंडा वसुंधराराजे वतीने आखण्यात आला  होता. राजस्थान  राजपुतांची संख्या १२% असून विधानसभेचे राजपूत बहुल ३३ मतदारसंघ राजस्थान राज्यात आहेत.   राजपुताना आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी वसुंधराराजेंनी फक्त एका राजपूत आमदाराला आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तेही याची राज्यमंत्री पदावर बोळवण केली आहे. तर भाजपाला गेल्या निवडणुकीत फक्त तीन राजपूत आमदार निवडून आणण्यात यश आले आहे. तसेच राजमहल जमीन वाद, पद्मावत चित्रपटाचा वाद, गँगस्टर आनंदपाल सिंहचा एन्काऊंटर, गजेंद्र सिंह शेखावत यांना वसुंधराराजे करत असलेला विरोध यामुळे भाजपवर राजपूत नाराज आहेत.

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री राजपूत नेते जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह यांचा काँग्रेस भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. वसुंधराराजेंच्या राजपूत द्वेषामुळे आगामी काळात भाजपला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. भाजपला आगामी निवडणूक सोपी नसणार आहे असे अनेक धुरंदर राजकीय जाणकारांनी सांगितले आहे तरी भाजपने पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. राजपुतांच्या अस्मितेवर फुंकर घालण्याचा आणि राजपुताना भुलवण्याचा भाजपकडून चांगलाच प्रयत्न केला जाणार आहे. भाजपने त्या ३३ जागी निवडणूक लढण्यासाठी विशेष रणनीती आखली असून केंद्रातील राजपूत मंत्र्यांना प्रचाराच्या आखाड्यात उतरवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाजपने प्रचाराची सर्व आयुक वापरली तरी पूर्व परंपरेनुसार  एकाच पक्षाचे सलग दुसऱ्यांदा सरकार राजस्थानात येणे शक्य नाही असे सर्वत्र बोलले जाते आहे.