धक्कादायक ! तांत्रिकाने 10 वर्षाच्या मुलीला जाळले, नंतर स्वतः केली आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाईन : राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका तांंत्रिकाने आधी 10 वर्षांच्या मुलीला तंत्रविद्येमुळे जाळले आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. घटनेेेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना बखासर पोलिस ठाण्याच्या सीमाभागातील आहे. ज्याने हा गुन्हा घडविला तो गुन्हेगार निर्वासित आहे. ज्याचे नाव राम भील आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेले पोलिसही हैराण झाले, कारण त्या तांत्रिकाने त्याच्या घरात एक समााधी बांधली होती. यासह त्याच्या घरातून तंत्रविद्येची सामग्रीही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना समजले की, तांत्रिक गेल्या दोन वर्षांपासून गावात राहत होता.

यूपीमध्ये कब्रमधून गायब झाला मुलाचा मृतदेह

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्येही अशीच धक्कादायक घटना समोर आली होती. चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह कब्रमधून काढण्यात आला. ही घटना तंत्र मंत्राशी संबंधित असल्याची दिसली. मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला.