चिखलामुळे इम्युनिटी वाढीचा दावा करणार्‍या भाजप खासदाराला ‘कोरोना’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शंख वाजवल्याने आणि चिखलात अंघोळ केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे कोरोनाला दूर ठेवण्यास मदत होऊ शकते, असा दावा करणारा भाजप खासदाराला कोरोना झाला आहे. पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी सर्वच खासदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये राजस्थानमधील भाजप खासदार सुखबीर सिंह जौनपुरिया कोरोनाची लागण झाले आहे.

सुखबीर सिंग जौनपुरिया हे टोंक सवाई माधोपूरचे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये ते चिखलात बसलेले होते. त्यांच्या हातात शंख होता.त्यांनी शंख वाजवल्याने आणि चिखलात अंघोळ केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढ त असल्याचा दावा केला होता. मात्र आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. व्हिडीओत त्यांनी कोणत्याही औषधाने रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाही. तर नैसर्गिक घटकांनी ती वाढते. शंख वाजवा, चिखल, पावसात भिजा, उन्हात जा, शेतात काम करा यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. माझ्या मतदारसंघातही एकही कोरोनाग्रस्त नाही. असे म्हटले होते.