वसुंधरा राजे In Action ! गहलोत सरकारच्या अडचणीत प्रचंड वाढ, भाजपा उद्या आणणार अविश्वास प्रस्ताव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. शुक्रवारपासून विधानसभेचे सत्र सुरू होत आहे. उद्या भारतीय जनता पक्षाने सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत अशोक गहलोत सरकारसमोर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे. भारतीय जनता पक्षाची गुरुवारी बैठक झाली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

भाजपाचा दावा- गहलोत सरकार टिकणार नाही
विधानसभेतील भाजपा नेते गुलाबचंद कटारिया म्हणाले की कॉंग्रेस आपल्या घरात टाके घालून कपडे जोडण्याचा प्रयत्न करीत आहे, पण कापड फाटले आहे. हे सरकार लवकरच पडणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया म्हणाले की हे सरकार आपल्या विरोधाभासातून पडेल, भाजपावर हे खोटा आरोप लावत आहेत. पण त्यांच्या घरातील भांडणाशी भाजपचा काही संबंध नाही.

गुरुवारीच भारतीय जनता पक्षाने जयपूरमध्ये आमदारांसोबत एक मोठी बैठक घेतली. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही यात भाग घेतला, तर केंद्रीय नेतृत्वातील प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते. राज्यपालांच्या आदेशानंतर विधानसभेचे अधिवेशन 14 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तथापि, राज्य सरकार केवळ कोरोना विषाणूजन्य संकट, लॉकडाऊन व इतर विषयांवर चर्चा करणार असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, आता जर भारतीय जनता पक्षाने अविश्वास ठराव आणला तर चर्चेनंतर अशोक गहलोत सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागेल.

बहुमत सिद्ध करणे कॉंग्रेसला अवघड आहे?
बंडखोर नेते सचिन पायलट पुन्हा एकदा कॉंग्रेसकडे पोहोचले आहेत, अशोक गेहलोत-सचिन पायलट गटाचे आमदार गुरुवारी संध्याकाळी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजेरी लावतील. असं म्हटलं जात आहे की पायलट गट पुन्हा परत आल्यामुळे बर्‍याच आमदारांचा राग आहे आणि याबद्दल पक्षाच्या हाय कमांडला चिंता लागून आहे. दुसरीकडे बसपाच्या आमदारांच्या विलीनीकरणाचा मुद्दा अजूनही कोर्टात सुरू आहे, अशा परिस्थितीत अशोक गहलोत सरकारच्या समोर पायलट गटाला समजावण्याबरोबरच त्यांच्या गटातील आमदारांना एकत्र ठेवण्याचे देखील आव्हान असेल. राजस्थान विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत, त्यापैकी कॉंग्रेसकडे 107 आहेत. त्याचबरोबर बर्‍याच अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. तर मित्रपक्षांसह भाजपचा आकडा 76 आहे. परंतु अलीकडील मनमुटावानंतर बहुमत सिद्ध करणे इतके सोपे नाही.