Rajasthan Cabinet Reshuffle | गहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे, मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

जयपूर : वृत्तसंस्था – Rajasthan Cabinet Reshuffle | राजस्थानमध्ये गेहलोत मंत्रिमंडळातील (ashok gehlot cabinet) सर्व मंत्र्यांनी आज (शनिवार) राजीनामे (Resignation) दिले आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार (Rajasthan Cabinet Reshuffle) केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गहलोत यांच्या घरी महत्त्वाची बैठक झाली. बैठकीनंतर गहलोत सरकारमधील सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले. उद्या दुपारी दोन वाजात काँग्रेस मुख्यालयात (Congress headquarters) महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

 

राजस्थानमध्ये शनिवारी मोठी राजकीय घडामोड झाली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (ashok gehlot) यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा (Rajasthan Cabinet Reshuffle) दिला. दरम्यान राजस्थानमध्ये गेहलोत आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यात समेट झाल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नवीन मंत्रिमंडळाचा शपथ विधी रविवारी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी काही मंत्री राजीनामे देतील आणि दोन्ही गटातील नेत्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान (Rajasthan Cabinet Reshuffle) दिले जाईल अशी चर्चा होती. मात्र, आता सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

हे असू शकतात नवे मंत्री

नव्या मंत्रिमंडळात सचिन पायलट यांच्या काही समर्थक आमदारांची नावे समोर आली आहेत.
यामध्ये हेमाराम चौधरी, ब्रिजेंद्र ओला, दिपेंद्र सिंह शेखावत, रमेश मीणा आणि मुरारीलाल मीणा यांची नावे आहेत.
तर गेहलोत यांच्या समर्थक आमदारांमध्ये बसपाचे राजेंद्र गुढा, निर्दलीय महादेव खंडेला, संयम लोढा,
काँग्रेस आमदार महेन्द्रजीत सिंह मालवीय, रामलाल जाट, मंजू मेघवाल, जाहिदा खान आणि शंकुतला रावत.

 

Web Title :- Rajasthan Cabinet Reshuffle | new cabinet to be formed in rajasthan congress these may be from ashok gehlot and sachin pilot groups

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Safe Online Transactions | मोबाईलवर घेत असाल Loan तर जाणून घ्या काय आहेत धोके आणि कसा करावा त्यापासून ‘बचाव’; DoT ने जारी दिला ‘सल्ला’

ST Workers Strike | तणावात असलेला लातूरच्या निलंगा डेपोतील एसटी कर्मचारी घरात कोसळला, उपचारादरम्यान झाला मृत्यू

Facebook India | छोटा व्यवसाय मोठा करण्यासाठी पैसा असो की तंत्रज्ञान Facebook देतंय प्रत्येक सुविधा, जाणून घ्या कोणाचा होणार फायदा