ऑडियोवरून 2 FIR, केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या चौकशीसाठी दिल्लीला रवाना झाली राजस्थान SOG

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये गेहलोत सरकार पाडण्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, ऑडियो क्लिपमध्ये माझा आवाज नाही. मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. यादरम्यान गजेंद्र सिंह शेखावत यांची चौकशी करण्यासाठी राजस्थानचा स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) दिल्लीला रवाना झाला आहे.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे म्हणणे आहे की, ऑडियो फेक आहे. मी मारवाड भाषेत बोलतो, परंतु ऑडिओ टेपमध्ये झुंझुनू टच आहे. ज्या गजेंद्रचा उल्लेख करण्यात आला आहे, त्याच्या कोणत्याही पदाचा उल्लेख नाही. कोणत्या जागेचाही उल्लेख नाही. ऑडियो मोडतोड करून सुद्धा तयार केला जाऊ शकतो.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, मी अनेक संजय जैन नावाच्या व्यक्तींना ओळखतो. यासाठी मला सांगावे की कोणता संजय जैन आहे आणि त्यांनी माझ्या कोणत्या मोबाईल नंबरवर बोलणे केले आहे. दरम्यान एसओजीकडून सांगण्यात आले की, महेश जोशी यांनी तक्रारी केली आहे.

एसओजीने म्हटले की, यामध्ये काँग्रेसचे निलंबीत आमदार भंवरलाल शर्मा, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि दलाल संजय जैन आपसात आमदार खरेदी-विक्री बाबत बोलत आहेत. या ऑडियोची चौकशी करून कारवाई केली जाईल. संजय जैनला काल दिवसभर चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आज पुन्हा 10 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर आमदार खरेदी करण्याचा आरोप केला आहे. सुरजेवाला यांनी दोन ऑडिओचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि बंडखोर आमदार भंवर लाल शर्मा यांच्यामध्ये पैशांच्या व्यवहारावर चर्चा होत आहे.

ऑडियो आल्यानंतर दोन आमदार निलंबीत
रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले की, राजस्थानचे सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे, याचे काही ऑडिओसुद्धा समोर आले आहेत, ज्यामध्ये राजस्थानच्या काँग्रेस आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत या संपूर्ण कटात सामिल आहेत. त्यांच्यावर ताबडतोब एफआयआर दाखल झाला पाहिजे आणि अटक केली पाहिजे.

ऑडियो क्लिप समोर आल्यानंतर काँग्रेसने बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह यांना निलंबीत केले आहे. यासोबतच दोन्ही नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांनाही आपले स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.