‘रोमानिया’त अडकलेल्या राजस्थानमधील 3 तरुणांनी PM मोदींना केले ‘हे’ ‘आवाहन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जास्त पैसे मिळविण्याच्या इच्छेने परदेशात गेलेल्या चूरू जिल्ह्यातील सुजनगड शहरातील तीन तरुण तेथे अडकले आहेत. फसवणुकीला बळी पडलेले हे तीन तरुण आता रोमानिया येथे पोहोचले आहेत. तिघे तरुण तेथील शरणार्थी छावणीत अडकले आहेत. या मुलांच्या कुटुंबियांनी परराष्ट्र मंत्रालयात विनंती केली आहे की त्यांच्या मुलांना कुठल्याही अवस्थेत परत आणण्यात यावे. त्याचबरोबर रोमानियामध्ये अडकलेल्या तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की त्यांना परत भारत देशात नेण्यात यावे. अन्यथा ते तिथेच मरतील.

१२ – १२ लाख रुपये घेऊन धक्के खाण्यास सोडण्यात आले

युवकाच्या कुटुंबियांनी सांगितले की, विकास सैनी, रामेंद्र गहलोत आणि पंकज जांगिड यांना जर्मनीत वर्क परमिट देण्याचे आमिष दाखवून १२-१२ लाख रुपये घेऊन सुजानगढ येथील रहिवासी एजंट विनोद गेहलोत याने परदेशात पाठविले होते. पण येथून निघून गेल्यानंतर त्या तिघांनाही धक्के खाण्यासाठी सोडण्यात आले. तरुणांना दीड-दीड लाख रुपयांचे आमिष दाखवले गेले होते. परंतु जर्मनीऐवजी तिन्ही तरुण अझरबैजान, सर्बिया, हंगेरी आदी शहरांमध्ये धक्के खात आहेत. हंगेरी पोलिसांनी या तिघांना रोमानिया पोलिसांच्या स्वाधीन केले असून ते तेथील निर्वासित छावणीत राहत आहेत.

-८ डिग्री तापमान असलेल्या शरणार्थींच्या कॅम्पमध्ये राहण्यास भाग पाडले जाते

हे तिघे कधीकधी दुसर्‍याचा मोबाइल घेऊन आपल्या कुटुंबाशी बोलतात. परदेशात अडकलेल्या तरुणांनी फोनवर नातेवाईकांना सांगितले की त्यांचे मोबाइल व पासपोर्ट हिसकावून घेण्यात आले आहेत. दोन तरुण रोमानियाच्या निर्वासित छावणीत सात महिन्यांपासून आणि एक तरुण तीन महिन्यांपासून अडकला आहे. त्यांना कित्येक दिवसांपासून जंगलात पायी चालवले गेले. त्यांना नदीत चालवण्यात आले आणि आता -८ डिग्री तापमान असलेल्या शरणार्थी कॅम्प मध्ये राहणे त्यांना भाग पडले आहे.

रोमानियातून व्हिडीओ बनवून कुटुंबाला पाठविला

तिन्ही तरुणांनी रोमानियाहून कुटुंबातील सदस्यांना व्हिडिओ पाठवले आहेत. त्यांनी तेथे होणारी आपली दुर्दशा सांगितली आहे आणि असे म्हटले आहे की जगण्यापेक्षा मरणे चांगले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या तिघांनी आवाहन केले की, त्यांना तेथून भारतात परत घेऊन जावे. तसेच तिन्ही तरुणांकडून सुमारे ३६ लाख रुपयांची फसवणूक करणारा विनोद गहलोत मोकळा फिरत आहे. तो अजूनही १००० युरो प्रति युवक दराने तिघांना परत आणण्यासाठी पैसे मागत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/