गेहलोत गृह आणि वित्त मंत्री तर पायलट ग्रामविकास मंत्री

जयपूर : राजस्थान वृत्तसंस्था – अशोक गेहलोत हे सचिन पायलट यांच्यावर पुन्हा एकदा मात देऊन गेले आहेत. दोघांच्या सुप्त वादातच राज्याच्या विकासाचे घोडे गंगेत नाहणारच नाही असे चित्र राजस्थानच्या राजधानी स्थळी दिसत असल्याचे पाहण्यास मिळते आहे. काल रात्री उशिरा राजस्थान मंत्री मंडळाचे खाते वाटप झाले आहे. यात सर्वांना आश्चर्य चकित करून सोडणारी बाब म्हणजे राज्याचे गृह आणि अर्थ खाते गेहलोत यांनी आपल्या कडे ठेवले असून अन्य सात खाती त्यांनी आपल्या खिशात घातली आहेत. तर सचिन पायलट यांना ग्रामविकास खाते देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे अन्य चार खाती देऊन त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची अब राखली आहे.

१७ डिसेंबर रोजी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी राज्याच्या अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपत घेतली. त्यानंतर २४ तारखेला आपल्या मंत्र्यांची निवड करून त्यांना शपत देऊन घेतली. त्यानंतर कोणाला कोणते खाते द्यायचे याचा निर्णय घ्यायला गेहलोत यांना तीन दिवसाचा कालावधी लागला. त्यांनी काल रात्री उशिरा आपली खाते वाटपाची यादी जाहीर केली. त्यांच्या मंत्री मंडळात २३ मंत्र्यांचा समावेश असून गेहलोत-पायलट यांचा समावेश केल्यास मंत्रिमंडळाची संख्या २५ होते तर त्यांच्या मंत्री मंडळात  १३ कॅबेनेट तर १० राज्यमंत्री आहेत.

गेहलोत आणि पायलट यांचे गट निवडणुकीच्या अगोदर तरी उघड दिसत नव्हते परंतु ते गट निवडणुकी नंतर दोघात  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी अटीतटीची वाटणी झाल्या नंतर  स्पष्ट दिसू लागले आहे. तसेच दोघांमध्ये गटबाजी हि दिसू लागली आहे. २४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून तीन दिवस विलंबाने खाते वाटप करण्याचे कारण सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून स्पष्ट होते आहे. ते कारण हे आहे कि गेहलोत आणि पायलट यांना आपल्या आपल्या गटाच्या मंत्र्यांना चांगली मंत्रीपदे द्यायची होती परंतु दोघांमध्ये एकमत झाले नाही म्हणून हा  विषय घेऊन गेहलोत दिल्लीला गेले. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या तुगलक मार्गावरील १२व्या बंगल्यात बैठक मारली.  तेथेच  राजस्थान प्रभारी अविनाश पांडे आणि काँग्रेस  महासचिव केसी वेणुगोपाल येऊन दाखल झाले. खाते वाटपावर बरीच खलबते कुटल्या नंतर गेहलोत आपले म्हणणे राहुल गांधी यांच्या कंठातून उतरवण्यास यशस्वी झाले. सबब अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या गट बाजीच्या राजकारणात राज्याचा विकास लटकत राहिला तर नवल नबाळगावे.