सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधीवर केलेल्या ‘त्या’ टीकेनंतर दाखल झाल्या ३९ FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी यांच्या विरोधात कोकीनसंबंधित टीका केल्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना चांगलेच घेरण्यात आले आहेत. त्यांच्या विरोधात राजस्थानमध्ये २० याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका दाखल करण्यात आल्यानंतर विविध पोलीस ठाण्यात सुब्रमण्यम यांच्या विरोधात तब्बल ३९ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. या एफआयआर यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दाखल करण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण –

स्वामी यांनी गुरुवारी राहुल गांधींवर आरोप केला होता की ते अंमली पदार्थांचे सेवन करतात. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले आवेदनात ५०४ आणि आयपीसी कलम ५११ अंतर्गत खटला दाखल केला. काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे की सुब्रमण्यम स्वामी त्यांनी केलेल्या टीकेसंबंधित माफी मागावी.

तक्रार दाखल करणाऱ्यांनी सांगितले की काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या विरोधात स्वामींनी केलेली टीका त्यांची भावना दुखावणारी आहे. हे कृत्य मानहानी करणारे आहे. राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि आरटीआय विभागाचे अध्यक्ष सुशील शर्मा यांनी जयपूरच्या एसीजेएस न्यायालयात स्वामीच्या विरोधात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. शर्मांनी या अंतर्गत मनाहानी म्हणून १ कोटीचा दावा स्वामी यांच्यावर केला आहे.

शर्मा यांनी सांगितले की, स्वामींनी सार्वजनिक पद्धतीने माफी मागावी, काँग्रेसची प्रतिमा खराब करुन राजकीय लाभ मिळण्याचा प्रयत्न ते करत आहे. ५ जुलैला मुद्दामहून राहुल गांधींबाबत अयोग्य टीका त्यांच्याकडून करण्यात आली होती.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय