राजस्थानच्या राजकारणात सेफ अन् सुरक्षित ‘लँडिंग’च्या शोधात ‘पायलट’ पण ‘हवामान’ खराब !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सध्या राजस्थानमधील राजकीय घडामोडींना उधाण आलं आहे, एकीकडे मुख्यमंत्री अशोक गहलोत आपली खुर्ची वाचवताना राज्यात आणि पक्षात आपले वर्चस्व कायम राखण्यात गुंतले आहेत, तर दुसरीकडे सचिन पायलट आपल्या सोबत अनेकांना घेऊन जात स्वत: ला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. राजस्थानच्या राजकारणात आता असे म्हंटले जात आहे की, सचिन पायलटला त्यांच्या सामर्थ्याची जाणीव होती पण त्यांना समोरच्याची ताकद ओळखता आली नाही. त्यांच्याकडे सध्या जितके आमदार आहेत, त्यावरून असे वाटत नाही कि ते समोरच्याची खुर्ची बुडवू शकतील.

सचिन पायलट यांनी यापूर्वीच पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपद गमावले आहे आणि ज्या वेगाने राज्य आणि पक्षात राजकीय समीकरणे बदलली आहेत, त्यामुळे त्यांचा मार्ग आणखी कठीण बनविला आहे. त्यांच्यावर सतत भाजपशी संगनमत असल्याचा आरोप होत आहेत. आमदारांच्या सदस्यत्वाचे प्रकरण न्यायालयात आहे, येत्या मंगळवारी सुनावणी आहे, निर्णय कधी येईल, याआधीच विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्याच्या बातम्या त्यांच्यासाठी चांगल्या नाहीत. सचिन पायलटच्या राजकीय जीवनात आजपर्यंत अशाप्रकारचे आव्हान कधीच आले नव्हते.

पक्ष आणि राज्यात सूरू आहे ‘जादूगारा’ची जादू
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना राजस्थानच्या राजकारणात जादूगार म्हटले जाते. त्यांनी सचिन पायलटच्या आव्हानाचा सामना चांगलाच केला आणि आतापर्यंत ते खुर्ची वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. खुर्ची वाचवण्याबरोबरच अशोक गहलोत पायलट यांचे पून्हा घरी परतणे आणि त्यांच्या रस्ता कठिण बनवताना दिसत आहे. एकामागून एक घेतलेले निर्णय गहलोत यांच्यासाठी खरे ठरले आहेत. कोर्टाच्या सुनावणीत जे काही होईल ते नंतरचे प्रकरण आहे, त्याचबरोबर जे विधानसभा अधिवेशन आता बोलावल्याची बातमी आहे हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे. तसेच राजस्थानमधील राजकीय गोंधळाच्या दरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन आपल्या सरकारच्या बहुमताचा दावा केला आहे. त्यांच्याकडे 102 आमदारांची यादी दिली.

दरम्यान, सचिन पायलट यांच्यावर सतत आरोप होत आहे की, ते भाजपच्या मदतीने हे सर्व करत आहेत. मात्र सचिन पायलट भाजपमध्ये जायला नकार देत आहेत. कॉंग्रेस नेत्यांशी त्यांचे संवाद आणि समजूत सुरु असल्याच्या बातम्या आहेत. भाजपमध्येही पायलट यांच्याबाबत वेगवेगळी मते आहेत. दरम्यान, कॉंग्रेस आणि भाजपचे मोठे नेते हा सगळा तमाशा पाहत आहेत.

भोवऱ्यात अडकले पायलट
सचिन पायलट राजकीय भोवऱ्यात अडकले आहे. यातून ते बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यांच्या पक्षही त्यांना वाचवू इच्छित आहे. दुसरा पक्षही वाचवण्यासाठी उभा आहे, पण तेथे संभ्रम आहे. आता अडकलेल्या पायलट यांना निर्णय घ्यायचा आहे की. ते स्वत: हून बाहेर येतील की एखाद्याची मदत घेतील.