काय सांगता ! होय, राजस्थानचा ‘हा’ बकरा एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, दररोज देतोय अर्धा लिटर दूध

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानमधील एक बकरा आजकाल लोकांच्या कुतूहलाचे कारण बनला आहे. या बकऱ्याची विशेष गोष्ट म्हणजे तो एखाद्या बकरीसारखं दररोज दूध देत आहे, यामुळे लोकही आश्चर्यचकित आहेत. तथापि, पशुवैद्यकांचा असा विश्वास आहे की हा कोणता चमत्कार नाही तर संप्रेरकांच्या गडबडीमुळे या बकऱ्यामध्ये बकरीसारखे लक्षण दिसत आहेत आणि तो दूध देत आहे. परंतु लोक यास एखाद्या चमत्कारापेक्षा कमी मानत नाहीत.

एनबीटीच्या अहवालानुसार, ढोलपूरच्या गुर्जा गावातील हा बकरा लोकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. बकऱ्याचे मालक राजवीर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या बकऱ्याला जवळ जवळ 16 महिन्यांपूर्वी खेड्याजवळीलच मनिया शहरात भरत असणाऱ्या पशुबाजारातून अडीच हजार रुपयांना खरेदी करून आणले होते. राजवीर सांगतात की संप्रेरकांच्या गडबडीमुळे बकरा दररोज सकाळी आणि संध्याकाळी 1 लिटर दूध देतो. राजवीर सांगतात की जेव्हा त्यांनी बकरा आणला तेव्हा तो फक्त 2 महिन्यांचा होता.

राजवीर यांनी सांगितले की 6 महिन्यांपूर्वीच बकऱ्याच्या संप्रेरकांमध्ये गडबडी सुरू झाली ज्यामुळे बकऱ्यात मादी बकरीचे अवयव विकसित झाले आणि त्यानंतर तो दूध देऊ लागला. राजवीर सांगतात की संपूर्ण परिवारासह ते या बकऱ्याच्या दुधाचे सेवन करतात व त्या दुधाचा त्यांना काही त्रास देखील झालेला नाही.

त्याचवेळी बकरा दुध देतो हे ऐकून जवळील खेड्यांतील गावकरी त्याला भेटायला येत आहेत. एक बकरा दूध देत असल्याचे वृत्त संपूर्ण जिल्ह्यात प्रथमच लोकांनी ऐकले आहे आणि लोक हे जाणून आश्चर्यचकित झाले आहेत. वृत्तानुसार, बकऱ्याच्या दूध देण्याची माहिती ऐकल्यानंतर लोक बकरा मालकाच्या घरी त्याची माहिती घेण्यासाठी पोहोचत आहेत. त्याचवेळी या प्रकरणात पशु डॉक्टर राम अवतार सिंघल यांनी सांगितले की असा बकरा 10 लाखांत एक असतो. या बकऱ्याचे दूध सेवन केल्यास राजवीरच्या कुटूंबाला कुठलाही त्रास होणार नाही, असे देखील राम अवतार सिंघल यांनी सांगितले.