वसुंधराराजे यांच्या विरोधात भाजपच्या बड्या नेत्याचा मुलगा राहिला उभा

जयपूर : राजस्थान  वृत्तसंस्था-राजस्थानच्या विद्यमान मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या विरोधात भाजपचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे पुत्र  मानवेंद्र सिंह  यांना काँग्रेसने उमेदवारी देऊन राजस्थानच्या निवडणुकीत चांगलेच राजकीय रंग भरले आहेत. झालरापाटन या मतदार संघातून वसुंधराराजे यांची पारंपरिक लढत असते याच मतदार संघात  मानवेंद्र सिंह काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे या ठिकाणी काय निकाल लागणार या बद्दल आत्ताच अंदाज वर्तविले जात आहेत.

झालावाड जिल्ह्यातील चारी मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले आहेत. त्याच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसने चांगलीच रणनीती आखली आहे. माध्यमांच्या चर्चेत हा जिल्हा राहावा आणि वसुंधराराजेंना शह देता यावा तसेच माध्यमांच्या चर्चेत राहण्यासाठी काँग्रेसची हि खेळी असल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात येते आहे. काँग्रेसने शनिवारी दुपारी राजस्थान विधानसभेसाठीची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत मानवेंद्र सिंह यांच्या नावाचा समावेश होता.

भाजप आणि काँग्रेसचे मुष्टीयुद्ध राजस्थान राज्यात चांगलेच रंगते आहे. भाजपने सकाळी आठ उमेदवारांची यादी जाहीर केली असतानाच आता काँग्रेसने दुपारी आपल्या ३२ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यांच्या लढाईची चर्चा राष्ट्रीय राजकरणात हि रंगू लागली आहे. झालावाड जिल्ह्यातील डग, झालरापाटन, खानपूर आणि मनोहर थाना या चार मतदार संघात भाजपचा चांगलाच  दबदबा आहे. भाजपच्या  संघटित बाले किल्ल्यात चांगलीच खळबळ माजवण्याचे  काम काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली खेळी  पलटवण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

काँग्रेसने राजस्थान मध्ये सत्तेवर येण्यासाठी चांगली तयारी केली असून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या सारख्या हुशार आणि मुसद्दी नेत्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. काँग्रेसने  पायलट आणि गेहलोत यांच्या जोडीला  विधानसभेच्या निवडणुकीत उतरवल्याने निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. काँग्रेसच्या रणनीतीला  भाजप कसा टक्कर देईल हे पाहण्यासारखे राहणार आहे. भाजप वसुंधराराजेंच्या नेतृत्वात हि निवडणूक लढत असून राजस्थानच्या निवडणुकीच्या परंपरे नुसार कोणत्याच एका पक्षाला सलग दोनवेळा सत्ता मिळत नाही  त्यामुळे काँग्रेसच्या पारड्यात राजस्थानची सत्ता जाणार का असा सवाल आता विचारला जातो आहे. तर आपल्या हाती अगदी सहज सत्ता येणार असा काँग्रेने समज करून घेतला आहे तर भाजपने मोठी लढत देण्याचा इरादा केला आहे.