म्हणून ‘त्या’ बाळाचे नाव ठेवले ‘अभिनंदन’

जयपूर : राजस्थान वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका ज्यावेळी झाली , त्याच वेळी एका महिलेने बाळाला जन्म दिला. म्हणून त्या बाळाचे नाव अभिनंदन ठवण्यात आले. हि घटना राजस्थान मधील अल्वर जिल्हयात घडली आहे.

बाळाचे आजोबा जनेश भुतानी यांनी सांगितले कि, माझ्या सुनेने शुक्रवारी संध्याकाळी मुलास जन्म दिला आहे. त्याच वेळी पाकिस्तानच्या अटकेत असणारे भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात आली. अभिनंदन यांचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही अभिनंदन त्यांची सुटका ज्या दिवशी होणार होती. त्या दिवशी दिवसभर टीव्ही बघत होतो. आमच्या सोबत आमची सून हि टीव्हीवर अभिनंदन यांच्या सुटकेच्या बातम्या बघत होती. बातम्या बघत असतानाच सुनेस प्रसववेदना सुरु झाल्या आणि अभिनंदन यांची सुटका झाली. त्यावेळी सुनेने पुत्राला जन्म दिला म्हणून आम्ही त्या मुलाचे नाव अभिनंदन ठेवले.

अभिनंदन या नावाने मी माझ्या मुलाला शूर वैमानिकाच्या शौर्याची कहाणी सांगत राहील. माझ्या मुलाने देखील मोठा होऊन सैन्यात भरती व्हावे , आणि देशाची सेवा करावी असे बाळाची आई सपनादेवी यांनी माध्यमात आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.