Rajsthan | भाजपा नेत्यावर हल्ला, शेतकरी आंदोलनकर्त्यांनी केली मारहाण, कपडे फाडले

श्रीगंगानगर : वृत्त संस्था – Rajsthan | राजस्थानच्या श्रीगंगानगर (Shreeganganagar) मध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांनी भाजपा नेते (BJP Leader) कैलास मेघवाल (kailash Meghwal) यांना मारहाण (attacked) केली आणि त्यांचे कपडे फाडले. मेघवाल राजस्थान (Rajsthan) च्या काँग्रेस सरकारविरूद्ध महागाई आणि सिंचनाच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यासाठी गेले होते.

रिपोर्टनुसार, श्रीगंगानगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भाजपाने राज्य सरकारविरोधात आंदोलनाचे आयोजन केले होते. येथूनच थोड्या अंतरावर संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांचे सुद्धा आंदोलन (Farmer Protest) सुरू होते. भाजपा नेते मेघवाल आपल्या पक्षाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात होते, तेव्हा ते चुकून शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले.

मेघवाल यांच्या गळ्यात भाजपाच्या कमळाच्या निशाणीचा गमछा होता, जो पाहून आंदोलनकर्ते शेतकरी संतापले. यानंतर मेघवाल यांची शेतकर्‍यांनी धुलाई केली, त्यांचे कपडे फाडले. सोशल मीडियावर वायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्यांनी मेघावाल यांना घेरले आहे आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

यानंतर संतापलेल्या आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी भाजपाच्या आंदोलन स्थळाकडे जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलिसांनी लावलेले तीन बॅरिकेड्स त्यांनी तोडले.
आंदोलनकर्ते शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली, ज्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला.
यानंतर आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी भाजपाविरूद्ध घोषणाबाजी केली आणि तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.

या मारहाणीच्या प्रकारानंतर भाजपा प्रवक्ते यांनी मेघवाल यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला.
ते म्हणाले शेतकरी आंदोलनाच्या नावावर केली जाणारी हिंसा योग्य नाही.

Web Title : rajasthan farmer protest bjp sc leader kailash meghwal attacked and assaulted by protesters in sri ganganagar

Real Estate in Pune | पुण्यात रियल इस्टेटला येणार सुगीचे दिवस; झानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी

Weight Lose Tips | डायटिंग अन् उपवास नव्हे तर हे केल्यानं वेगानं कमी होईल वजन, जाणून घ्या

Police Officers Transfer | पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

Indian Oil | इंडियन ऑईलची जबरदस्त ऑफर ! ‘डिझेल भरा, बक्षिसं जिंका’ ऑफरमधून 2 कोटी जिंकण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या ऑफर