स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वी राजस्थानमधील राजकीय नाटय संपलं, मुख्यमंत्री गहलोत यांनी विधानसभेत सिध्द केलं बहुमत

जयपूर : वृत्तसंस्था –  राजस्थानमधील दिग्गज काँग्रेस नेते सचिन पायलट आणि त्यांच्या आमदारांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेले राजकीय संकट आज संपुष्टात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थान विधानसभेत शुक्रवारी बहुमत सिद्ध केले आहे. मात्र बहुजन समाज पक्षाने (बसपा) आपल्या माजी आमदारांना फ्लोअर टेस्ट दरम्यान राज्य सरकारच्या विरोधात मतदान करण्यासाठी व्हीप जारी केले होते.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यापूर्वीच पक्षाच्या बंडखोर नेत्यांना सुमारे एक महिन्याचा राजकीय गोंधळ आणि गडबड विसरून पुढे जाण्याची सूचना केली आहे. वास्तविक गेहलोत यांच्या गटातील अनेक आमदार सचिन पायलट आणि त्यांच्या गटातील १८ आमदार परत आल्यामुळे खूश नाहीत आणि त्यांनी मंगळवारी रात्री जैसलमेरमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान गेहलोत सरकारविरूद्ध बंडखोरी दाखवणारे माजी पर्यटनमंत्री विश्वेन्द्र सिंह आणि आमदार भंवरलाल शर्मा यांचे निलंबन काँग्रेस पक्षाने मागे घेतले आहे.

विशेष आहे की, राज्यातील गेहलोत सरकार पाडण्याच्या षडयंत्रामागे कॉंग्रेस भाजपवर दोषारोप करत आहे. कॉंग्रेसचा आरोप आहे की, भाजप त्यांच्या काही आमदारांना आमिष दाखवून गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेहलोत समर्थक आमदार १३ जुलैपासून जयपूरमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते, ज्यांना ३१ जुलै रोजी जैसलमेरमधील एका हॉटेलमध्ये पाठवण्यात आले होते. तर सचिन पायलट आणि त्यांच्या गटातील इतर १८ कॉंग्रेसचे आमदार राज्याबाहेर वास्तव्यास होते. मात्र सोमवारी नवी दिल्लीत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नेतृत्त्वावर नाराज झालेल्या पायलट यांच्यासह सर्व नेत्यांनी पक्षात परत जाण्याचा निर्णय घेतला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like