कामाची गोष्ट ! एप्रिलच्या पैशांनी ‘सिलेंडर’ नाही घेतलं तर अकाऊंटमध्ये नाही येणार रूपये

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उज्ज्वला योजनेंतर्गत मे आणि जून महिन्यात विनामूल्य सिलिंडर घेण्यासाठी एप्रिल महिन्यात मिळालेल्या अ‍ॅडव्हान्स रकमेमधून रिफिल घेणे आवश्यक आहे. एप्रिलमध्ये लाभार्थी सिलिंडर घेत नसेल तर मेची रक्कम हस्तांतरित केली जाणार नाही. मे आणि जूनची आगाऊ रक्कम घेण्यासाठी ग्राहक मागील महिन्यातील आगाऊ रक्कम वापरुन सिलिंडर घेऊ शकतो. जयपूर जिल्ह्यात उज्ज्वलाचे एकूण 3.14 लाख लाभार्थी आहेत.

अशा प्रकारे मिळेल विनामूल्य सिलिंडर

सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या खात्यात आगाऊ रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. यासाठी, ग्राहकांचे बँक खाते चालू असले पाहिजे आणि आधार बँकेशी जोडलेले असावे. जर ग्राहकाला आगाऊ रक्कम मिळाली नाही तर तो वितरकाशी संपर्क साधू शकेल किंवा हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकेल. त्याचबरोबर मोबाईलद्वारेही रिफिल बुकिंग करता येईल. बुकिंगसाठी कंपनीकडे मोबाईल नंबर नोंदवणे बंधनकारक नाही.