राजस्थानच्या काँग्रेस सरकारकडून पाठयपुस्तकात बदल, पुस्तकात सावरकर ‘वीर’ नाहीत, नोटबंदीचा दिला ‘धडा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील नव्या काँग्रेस सरकारने आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करत पाठ्यपुस्तकात देखील काही बदल केले आहेत, ज्याची आता बरीच चर्चा सुरु झाली आहे. राजस्थानातील काँग्रेस सरकारने माध्यामिक शिक्षणातील पुस्तकात थेट ‘वीर सावरकर’ या नावाबाबत काही बदल केले आहेत. ज्यामुळे आता चांगलाच वादंग उठण्याची शक्यता आहे.

राजस्थान सरकारने १२ वीच्या नव्या इतिहासाच्या पुस्तकात बदल करुन ‘वीर सावरकर’ हे नाव बदलून विनायक दामोदर सावरकर असे केले आहे. पुस्तकात सांगण्यात आले आहे की सावकरांनी तुरुंगात असताना कशा प्रकारे ४ वेळा इंग्रजाकडे द्या याचिका दाखल केली होती.

एवढेच नाही तर या पुस्तकात असे देखील सांगण्यात आले आहे की सावरकरांनी इंग्रजांना स्वत:ला पोर्तुगाली सांगितले होते, आणि त्यांनी सावरकरांनी भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न केला.
सावरकरांनी १९४२ साली भारत छोडो आंदोलानला विरोध केला असे देखील या पाठ्य पुस्तकात सांगण्यात आले आहे.

नोटाबंदीच्या धड्याचा अभ्यासक्रमात समावेश
एवढेच नाही तर या पुस्तकात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांचा देखील उल्लेख करत त्यात गांधींची हत्या केल्यानंतर गोडसेंना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर केस देखील चालवण्यात आली होती असे देखील सांगितले आहे. तर अकबर आणि महाराणा प्रताब यांच्यात युध्द झाल्याचा नव्याने उल्लेख देखील यात करण्यात आला आहे. या मुळे राजस्थानातील काँग्रेस सरकार वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

या नव्या अभ्यासक्रमात नोटाबंदीचा नवी धडाच राजस्थान काँग्रेस सरकारने अभ्यासासाठी टाकला आहे.राजस्थान बोर्डाची माध्यमिक शिक्षणाची नवी पुस्तके बाजारात आली आहेत. १३ फेब्रवारीला पुस्तक समीक्षण समितीकडून १२ वीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल करण्याची शिफारस केली. हे बदल ऐतिहासिक घटना, व्यक्ती यांच्याबाबत होते, जे मागील भाजप सरकारने त्यांच्या काळात केले होते.

सिने जगत –

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली……