‘पतंजलि’च्या खाद्यतेलात भेसळीची भेसळीच्या तक्रारीनंतर छापा, कारखाना सील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अ‍ॅलोपॅथी उपचारांवर टीका केल्या प्रकरणात आयएमएने एक हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकल्यानंतर योगगुरु बाबा रामदेव आता राजस्थान सरकारच्या(Government of Rajasthan) निशाण्यावर आले आहेत. राजस्थान सरकारने(Government of Rajasthan) गुरुवारी (दि.27) रात्री पतंजलिच्या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी मोहरीच्या तेलात भेसळ करण्यात येत असल्याचे समोर आले. यापार्श्वभूमीवर सरकारने पतंजलिचा अल्वर येथील खाद्यतेल कारखाना तातडीने सील केला आहे. ही कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईचे व्हिडिओ चित्रिकरण देखील करण्यात आले आहे.

Corona Vaccination : ‘कोरोना’मुक्त झालेल्यांसाठी लसीचा केवळ एक डोस पुरे असल्याचा निष्कर्ष?

बाबा रामेदव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारांवर टीका केल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं त्यांच्या विरोधात एक हजार कोटींचा मानहानीचा दावा केल्याने बाबा रामदेव अडचणीत आले आहेत. त्यातच अल्वर येथील पतंजलीच्या खाद्यतेलाच्या कारखान्यात भेसळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने बाबा रामदेव यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Pune : मोदी सरकारच्या 7 व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सेवाकार्य दिन’, 5 हजार कर्यकर्ते सहभागी होणार; कोरोना जनजागृती, आरोग्य शिबिरांचे आयोजन

यापूर्वी बाबा रामदेव यांची कंपनी असलेल्या पतंजलिकडून उत्पादन केल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलावर खाद्य तेल उद्योग संघटनेनं (SEA) आक्षेप घेतला होता. एसईएनं पतंजलिच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. ज्यात इतर कंपन्यांच्या तेलात भेसळ असल्याचा दावा पतंजली कडून करण्यात येत होता. दरम्यान, प्रशासनाला अल्वर जिल्ह्यातील खैरथलमध्ये पतंजलि ब्रँडच्या मोहरी तेलाच्या उत्पादन प्रकल्पात पॅकेजिंग आणि भेसळ केली गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली.

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

प्रशासनाकडून सिंघानिया ऑईल मिलवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी भेसळ होत असल्याचे समोर आल्यानंतर कारखाना सील करण्यात आला. कारखान्यात पतंजलिच्या पॅकेट्स मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या कारवाईवर अद्याप पतंजलिकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Immunity Booster Kadha : संसर्गापासून मुक्त होण्यास ‘या’ औषधी वनस्पतींचा काढा मोठी मदत करेल; इतर देखील अनेक फायदे, जाणून घ्या

तुळशीसह ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, फुफ्फुसे एकदम मजबुत अन् निरोगी बनतील, जाणून घ्या

कोरोना झालेल्या रग्णांना मधुमेहाचा धोका असतो? संशोधन काय म्हणते ते जाणून घ्या