पाकिस्तानकडून नवीन धोका, आता प्राण्यांवरही ठेवली जातेय नजर ! राजस्थानमध्ये ‘हाय अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुन्हा एकदा पाकिस्तानकडून भारताला नवा धोका निर्माण झाला आहे. बीएसएफ सैनिकांची सीमेवर तसेच तेथील प्राण्यांवर बारीक नजर असते. यावेळी धोका पाकिस्तानच्या प्राण्यांचा आहे. पाकिस्तानमध्ये पसरलेल्या कॉंगो हेमोरॅजिक फिव्हरमुळे भारतातही याचा धोका वाढला आहे. त्यामुळे भारत सरकार आणि राजस्थान सरकारने सीमेला लागून असलेल्या सर्व भागात अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर राजस्थानच्या वैद्यकीय विभागाने बाडमेर, जैसलमेर, बीकानेर, श्रीगंगानगर आणि जोधपूर या भागांत आरोग्य विभागाची टीम पाठविली आहे.

भारत सरकारकडून ‘अलर्ट’सह उपाययोजना :
गुजरातमध्ये देखील क्राइमीन कॉंगो हेमोरॅजिक फिव्हर रोग (CCHF) पसरण्याचा धोका आहे. आपल्या रूग्णांची वाढती संख्या पाहून केंद्र सरकारही चिंतेत आहे आणि सरकारने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नॅशनल सेंटर डिसीज ऑफ कंट्रोलची २ सदस्यीय टीम राजस्थानकडे पाठविली आहे. राजस्थानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सीसीएचएफ कॉंगो आजाराचे ४५ रुग्ण आढळले असून त्यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजार भारतासाठी धोकादायक ठरू लागला आहे. जोधपूरमध्ये या आजाराचे २ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना कॉंगो आजाराची पुष्टी झालेली नाही, परंतु त्यांना कॉंगो आजार असल्याची शंका डॉक्टर व्यक्त करीत आहेत. या व्यतिरिक्त जोधपूरमध्ये बाडमेरच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, त्यालाही कॉंगो रोगाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही आहेत रोगाची लक्षणे :
मुख्य वैद्यकीय अधिकारी भूपेंद्र बरूपाल म्हणाले, ‘हा रोग हिमोरल नावाच्या परजीवीद्वारे (पॅरासाईट) पसरला आहे, म्हणून त्याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका त्या नागरिकांना आहे ज्यांनी गुरे, गाय, म्हशी, शेळी, मेंढी इत्यादी जाती पाळल्या आहेत. सीसीएचएफ रोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या रेबेवेरिन हे औषध फार प्रभावी नाही.

हा एक विषाणूजन्य आजार आहे. सर्व प्रथम, उच्च ताप, मळमळ, डोकेदुखी, स्नायू, मान आणि पाठदुखीचा त्रास सुरु होतो. यानंतर, उलट्या, अतिसार, ओटीपोटात दुखणे आणि घशात खोकला आणि शरीरावर रक्तस्त्राव होण्यास सुरवात होते.

विषाणू पसरण्याचा धोका :
पाकिस्तानमधून भारतात हा विषाणू पसरण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सीमा ओलांडणाऱ्या गुरे आणि पाळीव जनावरांपासूनही आता धोका निर्माण झाला आहे. या जनावरांच्या अंगावर CCHF तापाची वाहक असणारी फळे आणि झुडपाला चिकटून इकडे येत असल्याचे त्याद्वारे संसर्ग होण्याची शक्यता आहे.