राजस्थानच्या राजकारणात अशोक गेहलोत यांचं पारडं जड, राज्यपाल कलराज मिश्रा ‘नरमले’

जयपूर  :  पोलीसनामा ऑनलाईन –  अखेर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं राजस्थानमधील राजकारणात पारडें जड ठरलं. राजस्थान राज्याचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी राज्य सरकारला विधानसभा अधिवेशन बोलावण्याचे आदेश दिलेत. विधानसभा अधिवेशन बोलावले जाऊ नये, असा आपला कधी प्रयत्न नव्हता, असे स्पष्टीकरणही त्यांनी केलं आहे. राजस्थानमधील राज्य सरकारने विधानसभा अधिवेशन बोलावण्यापूर्वी 21 दिवसांची नोटीस देण्याची अट राज्यपाल कलरकाज मिश्रा यांनी समोर ठेवली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालांची ’तक्रार’ केल्याचे म्हटलं होतं. ’मी काल पंतप्रधानांशी संवाद साधला आणि राज्यपालांच्या व्यवहाराबद्दल सांगितले. मी त्यांना त्या पत्रासंबंधीही माहिती दिली जे मी त्यांना सात दिवसांपूर्वी लिहिले होते.’

अशोक गेहलोत यांच्यासाठी दुसरी चांगली वृत्त म्हणजे, राजस्थान उच्च न्यायालयाने बहुजन समाजवादी पाटीच्या सहा आमदारांचा काँग्रेस पक्षात झालेल्या प्रवेशाविरुद्ध भाजपकडून दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. भाजपच्या मदन दिलावर यांच्याकडून ही याचिका दाखल केली होती.

तसेच राज्यपाल त्यांचं काम योग्य पद्धतीने करत नाहीत, असा आरोप करत अ‍ॅड. शांतनु पारीक यांनी राज्यपालांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी करणारी एक याचिका सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केली होती.

तसेच सचिन पायलट यांच्या गटातील तीन आमदारही लवकरच माघारी येणार आहेत, असा दावा काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

’आम्ही आत्ता नाही तर नऊ महिन्यांपूर्वी आमच्या सहा आमदारांचे काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तब्बल नऊ महिन्यानंतर बसपा याची आठवण आली. हे बसपाने भाजपच्या इशार्‍यावर केले. त्याच आधारावर बहुजन समाजवादी पार्टी अर्थात बसपाने व्हिप जारी केला होता. आम्हाला नोटीस धाडल्याचे बसपाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, अशी कोणतीही नोटीस आम्हाला मिळालेली नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत राहू’ अशी प्रतिक्रिया बसपा आमदार लखन सिंह यांनी व्यक्त केली आहे.

31 जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन बोलविण्याचा नवा प्रस्ताव राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे पाठविला होता. तसेच काँग्रेसच्या आमदारांनी आणि समर्थकांनी सुरक्षित वावर निश्चित करून प्रत्येक राज्याच्या राजभवनासमोर धरणे द्यावे आणि राजस्थानमधील विधानसभेचे अधिवेशन लवकर बोलविण्याची मागणी करावी, असे काँग्रेसने आवाहन केले होते. आपल्याकडे योग्य ते संख्याबळ असून विधानसभा अधिवशनामध्ये आपण बहुमत चाचणीसाठी तयार असल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अगोदरच केला आहे.

भाजपचा राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचा डाव फसला

राजस्थान राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. हे सरकार पाडण्यासाठी भाजप अर्थात भारतीय जनता पक्षाने अनेक प्रयत्न केले. त्यांनी काँग्रेसमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना बंडखोरी करण्यास भाग पाडल्याने राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार अडचणीत आले होते. तसेच यात भाजपने आम्ही त्यांना बंडखोरी करा अथवा, सरकार पाडण्याबाबत काहीही सांगितले नसल्याचेही बोलत आहेत.

तसेच जर सचिन पायलट भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत असणार आहे, असे भाजपकडून सांगण्यात आले होते. मात्र, सचिन पायलट हे भाजपमध्ये जाणार का? हा मुद्दा आता उपस्थित होत आहे. मात्र, त्यांनी असे काहीही अद्याप सांगितलेले नाही. त्यामुळे भाजपचा घोडेबाजार आता फसला आहे.

भाजपने काँग्रेसच्या आमदारांना विकत घेऊन त्या ठिकाणी भाजपचे सरकार स्थापन करण्याचा डाव असल्याचे सध्याच्या राजकारणावरून समजून येत आहे. मात्र, हा डाव काँग्रेसने कायदेशीर मार्गाने हाणून पाडला. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाचेच सरकार आता राजस्थानमध्ये असणार असून मुख्यमंत्री अशोक केहलोत यांचं पारडं जड झालं आहे. यातच भाजपचा राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्याचा डाव फसला आहे.