शालेय फीबाबत आला राजस्थान HC चा निर्णय ! 70 टक्केच घेऊ शकतात फी, 3 आठवड्यात भरावी लागणार

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थान उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की, शाळा एकूण शुल्कापैकी ७० टक्के फी घेऊ शकतात. पुढील वर्षाच्या ३१ जानेवारीपर्यंत मुलांच्या पालकांना तीन हप्त्यांमध्ये पैसे भरावे लागतील. राजस्थान हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस.पी. शर्मा यांनी हा निर्णय दिला आहे.

हायकोर्टाचा हा आदेश राजस्थान सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या खासगी शाळांच्या अपीलवर आला आहे. हा आदेश तीन याचिकांवर देण्यात आला होता, ज्याच्या माध्यमातून सुमारे २०० शाळांनी राजस्थान सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते. राजस्थान सरकारने शाळांना कोरोना दरम्यान बंदच्या वेळी पालकांकडून फी न घेण्यास सांगितले होते.

या तीन याचिकांच्या माध्यमातून खासगी शाळांनी राज्य सरकारच्या ९ एप्रिल आणि ७ जुलैच्या फी स्थिगितीच्या आदेशाला आव्हान दिले होते. राज्य सरकारच्या या आदेशामुळे खासगी शाळा फी वसूल करू शकल्या नव्हत्या.

वास्तविक कोरोना संकटामुळे राजस्थान सरकारने खासगी शाळा सुरू होईपर्यंत फी जमा करण्यास बंदी घातली होती. राजस्थान सरकारने खासगी शाळांकडून घेतले जाणारे शुल्क शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ९ एप्रिल रोजी राज्यातील खासगी शाळांकडून ऍडव्हान्स फी घेण्यावर ३ महिन्यांसाठी ३० जूनपर्यंत बंदी घातली होती. सरकारने ९ जुलै रोजी हा कालावधी शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत वाढवला होता. शिक्षणमंत्री गोविंद सिंह डोटासरा यांनी कोरोना काळात खासगी शाळांना ३० जूनपर्यंत तीन महिन्यांची फी पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते. हा आदेश नंतर शाळा सुरू होईपर्यंत पुढे वाढवण्यात आला होता.