‘घटस्फोट’ देण्यासाठी तयार होत नव्हती पत्नी, पतीनं तिच्या गुप्तांगात तापलेली ‘सळई’च घातली

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानच्या चूरु जिल्ह्यातील बीदासरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेला बंधक बनवून तिच्या पती, सासू-सासऱ्यांनी आगीत गरम केलेला लोखंडी रॉडने गुप्तांगाला चकटे दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मागील आठ दिवसांपासून सुरु होता. एवढेच नाही तर त्यांनी या महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. पीडितेने रात्री उशीरा बीदासर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पीडिता मोहनीदेवी नाथ म्हणाली, दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह घंटियाल गावातील मुनिनाथ याच्याशी झाला होता. या दरम्यान तिच्या पतीचे इतर महिलेशी देखील संबंध होते. त्यामुळे तो काही दिवसांपासून पत्नीपासून घटस्फोट मागत होता. परंतु महिलेने त्याला नकार दिला. त्यानंतर पती, सासू, सासरे, दीर यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पीडितेने सांगितले की मागील एक महिन्यापासून तिला मारहाण केली जात आहे.

20 फेब्रुवारीला पाच आरोपींनी या महिलेला झोपडीत बंधक बनवून ठेवले होते. तेथे तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला. लागोपाठ 8 दिवस लोखंडाचा रॉड गरम करु गुप्तांगावर आणि मांड्यावर चटके देऊन त्रास देण्यात आला. या दरम्यान पीडितेचे आजोबा तिला भेटण्यासाठी गेले होते. परंतु त्यांनाही सासरच्या मंडळींनी त्यांना मारहाण केली आणि तेथून त्यांना परत पाठवले. त्यानंतर आजोबा काही अन्य लोकांना घेऊन महिलेच्या सासरी गेले आणि पीडितेची सुटका केली. त्यानंतर पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली.