‘ऑनर किलिंग’च्या विरोधात पोलिसांचं ‘कॅम्पेन’, ‘खुलेआम’ प्रेम करा, ‘मुगल-ए-आजम’चा काळ गेलाय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुगल-ए-आजम सिनेमात तुम्ही पहिले असेल कि, अकबराने आपल्या मुलाला सलीमला अनारकली बरोबर असलेल्या प्रेमाची शिक्षा म्हणून भिंतीमध्ये जिवंत गाडले होते. कदाचित जगातील ती पहिली ऑनर किलिंगची घटना असेल. त्यानंतर आजपर्यंत चारशेपेक्षा जास्त वर्षांचा काळ लोटला मात्र, अजूनही भारतात मोठ्या प्रमाणात या घटना आपल्याला पाहायला मिळतात. ऑनर किलिंगच्या नावाखाली अनेक कुटुंब आपल्या प्रियजनांचा बळी देत असतात.

मात्र आता राजस्थानमध्ये अशाच प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणात पाऊल उचलले असून पोलीस या प्रेमी युगलांची सुरक्षा करणार आहेत. तीन दिवसांपूर्वी राजस्थान विधानसभेत ऑनर किलिंग बिल-२०१९ संमत झाले असून हा कायदा लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्याचबरोबर या कायद्याची जागरूकता नागरिकांमध्ये करण्यासाठी पोलिसांनी मुगल-ए-आजम या सिनेमातील एका दृश्याचा अतिशय सुरेख असा वापर केला असून राजस्थान पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले आहे कि, आता मुगल-ए-आजमचा जमाना गेला असून प्रेम करणे गुन्हा नाही. जर अशा प्रकारे कुणीही शारीरिक हिंसा केली तर यापुढे आजीवन कारावास भोगावा लागू शकतो त्याचबरोबर पाच लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला जाऊ शकतो.

मैत्री केली आहे तर पार पाडावी लागणार

मागील रविवारी पार पडलेल्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने पोलिसांनी ट्विट करत म्हटले कि, तुमच्याशी मैत्री केली आहे तर ती पार पाडावीच लागणार. त्याचबरोबर लिहिले आहे कि, आम्ही तुम्हाला वचन देती कि, आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत.

आरोग्यविषयक वृत्त –