Brahma Kumari : ब्रह्माकुमारी संस्थानच्या प्रमुख दादी जानकी यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक संघटनांपैकी एक ब्रह्माकुमारी संस्थेची मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी जानकी यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी रात्री दोन वाजता निधन झाले. दादी जानकी या स्वच्छ भारत मिशनच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील होत्या. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील माउंट अबूच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दादी जानकी जगातील एकमेव अशा महिला होत्या, ज्यांना जगातील सर्वात स्थिर मन (Most stable mind in the world) असण्याचा खिताब मिळाला होता. दादी जानकी यांचा अंत्यसंस्कार शुक्रवारी दुपारी ३:३० वाजता माउंट अबू येथील ब्रह्माकुमारीज संस्थानच्या शांतीवन येथे होणार आहे.

त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले की, ‘ब्रह्म कुमारी प्रमुख राजयोगिनी दादी जानकीजी यांनी परिश्रमपूर्वक समाजाची सेवा केली. इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यात त्या आघाडीवर होत्या. महिला सबलीकरणाच्या दिशेने त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय होते. या दुःखाच्या क्षणी मी त्यांच्या असंख्य अनुयायांसोबत आहे. ओम शांती.’

ब्रह्माकुमारीज संस्थानच्या मुख्य प्रशासिका

राजयोगिनी दादी जानकीचा जन्म १ जानेवारी १९१६ रोजी हैदराबाद सिंध (जो आता पाकिस्तानात आहे) येथे झाला होता. वयाच्या २१ व्या वर्षीच त्या या संस्थेची जोडल्या गेल्या. सन १९७० मध्ये त्या भारतीय संस्कृती, मानवी मूल्ये आणि राज योगाचा संदेश देण्यासाठी पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्या. ब्रह्मा कुमारिस संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या निधनानंतर त्या २७ ऑगस्ट २००७ रोजी संस्थेच्या मुख्य प्रशासिका झाल्या. त्यांच्या संस्थेत सुमारे ४६ हजार महिला त्यांच्यासमवेत येऊन काम करत आहेत. २७ मार्च रोजी रात्री २ वाजता ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्य प्रशासक राजयोगिनी दादी यांचे निधन झाले. त्यांना माउंट अबूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दादी जानकी यांचे जीवन

जगभरात दादी म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजयोगिनी दादी जानकीचा जन्म १ जानेवारी १९१६ रोजी हैदराबाद सिंध येथे झाला होता, जो आता पाकिस्तानमध्ये गेला आहे. वयाच्या २१ व्या वर्षी दादी जानकी यांनी आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्याचे ठरविले होते. १९७० मध्ये त्यांनी भारतीय संस्कृती, मानवी मूल्ये आणि राज योगाचा संदेश देण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडे वळल्या होत्या. त्यांनी जगातील १४० देशांमध्ये ब्रह्माकुमारी केंद्रे स्थापन केली. यावेळी त्यांनी लाखो लोकांच्या मनात आध्यात्मिक चिंतनाची इच्छा आणि मानवी मूल्यांची बीजे रोवली. असे म्हटले जाते की त्यांच्या सानिध्यात सुमारे ४६ हजार तरूण बहिणींनी आपले जीवन ईश्वराच्या सेवेसाठी वाहिले. या सर्वांच्या त्या पालक होत्या.