आश्‍चर्यजनक ! खायला भाकर नाय, पण इन्कम टॅक्सनं टाकलेल्या छाप्यात समजलं ‘ती’ १०० कोटीची मालकीण

जयपूर : वृत्तसंस्था – आयकर विभागाला १०० कोटी संपत्तीची एक अशी मालकीण सापडली जी आपल्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी एक एक पैसा जोडते. आयकर विभागाने जयपूर दिल्ली हायवे वर १०० कोटी पेक्षा जास्त किमतीची ६४ क्षेत्रफळ जमीन शोधली आहे. ज्याची मालकीण एक आदिवासी महिला आहे. तिने ही जमीन कधी आणि कुठे विकत घेतली याबाबत त्या माहिलेला काहिही माहिती नाही. आयकर विभागाने ही जमीन आपल्या ताब्यात घेतली आहे.

जयपूर दिल्ली हायवेवर दंड गावात येणाऱ्या या जमिनीवर आयकर विभागाने पाटी लावली आहे. पाटीवर लिहिण्यात आले की निनावी संपत्तीच्या निषेधार्थ या जमिनीला निनावी जमीन म्हणून घोषित करत आयकर विभाग ही जमीन स्वतः  च्या ताब्यात घेत आहे. ५ गावातल्या ६४ क्षेत्रफळाच्या जमिनीवर लागलेल्या पाटीवर लिहिले आहे की, या जमिनीची मालकीण संजू देवी मीणा आहे. जी या जमिनीची मालकीण नाही होऊ शकत, म्हणून ही जमीन आयकर विभागाने आपल्या ताब्यात घेतली आहे.

खरतर आयकर विभागाकडे तक्रार गेली होती की दिल्ली हायवे वर मोठ्या संख्येने दिल्ली आणि मुंबई चे उद्योगपती आदिवास्यांच्या खोट्या नावावर जमीन खरेदी करतात. यांची फक्त कागदावर देवाण-घेवाण चालू आहे. कायद्यानुसार आदिवासींची जमीन आदिवासीच खरेदी करू शकतात. जमीन खरेदी केल्यानंतर ही मोठी लोकं आपल्या नावावर जमीन करत पावर ऑफ अटॉर्नी साइन करून घेतात. असे लक्षात आल्यानंतर आयकर विभाग या जमिनीच्या खऱ्या मालकिणीच्या शोधात निघाले असता ही मालकीण राजस्थान येथील दिपावास या गावातील रहिवाशी असल्याचे समजले.

या घटनेनंतर एका हिंदी वृत्तवाहिनीने संजू देवी मीणा यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, त्यांचे पती आणि सासरे मुंबई मध्ये काम करायचे. त्यावेळी २००६ मध्ये जयपूर मधल्या आमेर येथे त्यांना घेऊन जाण्यात आले आणि तिथे त्यांचा अंगठा लावला गेला होता. पण त्यांच्या पतीच्या मृत्यूला १२ वर्ष झाले आहे आणि त्यांना हे माहित नाही की त्यांची कोणती संपत्ती आहे आणि कुठे आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्यांना दर महिन्याला कोणीतरी ५००० रुपये देऊन जात असे. पण आता कित्येक वर्ष झाले आहे की पैसे देण्यासाठी कोणीच आलेले नाही. मला तर आजच समजले की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे.

संजू देवी यांच्या पतीच्या मृत्यूनंतर संजू देवी घर चालवण्यासाठी स्वतः  काम करत होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. कारण गावातल्या लोकांचे म्हणणे होते की खूप साऱ्या कंपन्यांनी येथे जमीन खरेदी केली आहे. गेल्या काही वर्षात आयकर विभागाने या परिसरातून १४०० कोटीची जमीन जप्त केली आहे. त्यातील ६९ कोटीच्या जमिनीचा कोर्टात निकाल लागलाआहे. या जमिनी निनावी असल्याचे घोषित करून त्या सरकारकडे जमा करण्यात आल्या आहेत.

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

भटक्या विमुक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा !

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार

ग्रामीण भागातील शेतकरी, दलित, अदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा- दिनकर पावरा